ENG vs IND Twiiter/ @BCCI
Sports

ENG vs IND: भारत '18-2' चा रेकॅार्ड मोडणार? भारतीय संघात परतणार 'हा' हिरा

भारत आणि इंग्लंड (ENG vs IND) यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ड्रा झाला.

वृत्तसंस्था

भारत आणि इंग्लंड (ENG vs IND) यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ड्रा झाला. आता टीम इंडियाचा दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर खेळणार आहे. टीम इंडियाला ही कसोटी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेण्याची संधी आहे. नॉटिंगहॅम कसोटीच्या 5 व्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही त्यामुळे भारताला हातात आलेला सामना गमवावा लागला होता. पहिल्या कसोटीत (First Test Cricket) भारतीय गोलंदाजांनी बेहतरीन कामगिरी करत सामन्यावर पकड मिळवली होती. त्यातही इंगलंडचा कर्णधार जो रुटने सामन्यात शतक ठोकून 303 धावा उभ्या केल्या होत्या. दुसरा डावात भारताची सुरुवात चांगली झाली परंतू भारतीय संघा ऐवजी पावसाची बॅटींग पाहायला मिळाली त्यामुळे सामना ड्रा झाला.

मालिकेतील दुसरा सामना उद्यापासून लंडनच्या लॅार्ड्स मैदानावर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनूसार दुपारी 3.30 वाजता सुरु होणार आहे. भारतीय सलामीवीर मयंक अग्रवालही दुखापतीतून सावरला आहे. त्याने नेट प्रॅक्टिसमध्ये प्रचंड घाम गाळला आहे. नॉटिंगहॅम कसोटीच्या फक्त दोन दिवस आधी मयंक अग्रवाल नेट सरावादरम्यान जखमी झाला होता. मोहम्मद सिराजचा चेंडू त्याच्या हेल्मेटला लागला होता, त्यामुळे तो पहिल्या सामन्यातून वगळला होता.

लॅार्डवर भारतीय संघाची कामगिरी

भारतीस संघाने (Team India) आतापर्यंत या मैदानावर 18 पैकी फक्त 2 कसोटी जिंकल्या आहेत. पहिली कसोटी भारतीय संघाने 5 जून 1986 ला जिंकली होती. त्या कसोटी सामन्यात कपिल देव च्या नेतृत्वाखाली संघाने इंग्लंडचा 5 गडी राखून पराभव केला होता. भारतीय संघाने या विजयाच्या बरोबर 3 वर्षांपूर्वी 1983 मध्ये एकदिवसीय विश्वचषकही (1983 World Cup) जिंकला होता. या कसोटीत कर्णधार कपिल देवला (Kapil Dev) सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते.

यानंतर भारतीय संघाने दुसरी कसोटी आजपासून बरोबर 7 वर्षापुर्वी म्हणजे 17 जुलै 2014 रोजी जिंकली होती. तेव्हा भारतीय संघाने महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात 95 धावांनी सामना जिंकला होता. या सामन्यात भारताचा अनुभवी गोलंदाज इशांत शर्माने 7 बळी घेतले होते. लॅार्ड्सवर खेळल्या गेलेल्या 18 सामन्यांपैकी 2 सामन्यात भारताने विजय नोंदवला आहे. आता कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाला तिसरा सामना जिंकण्याची संधी असणार आहे.

वेगवान गोलंदाज इशांत शर्मा या सामन्यात परतू शकतो. दुखापतीमुळे त्याला मालिकेची पहिली कसोटी खेळता आली नाही, पण यावेळी तो पूर्णपणे तंदुरुस्त दिसत आहे. खुद्द इशांतने त्याच्या सरावाचा फोटो शेअर केला आहे. मात्र, त्याच्या पूर्ण फिटनेसची अद्याप पुष्टी झालेली नाही. जर इशांत शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त असेल तर तो दुसऱ्या कसोटीत खेळणार हे जवळपास निश्चित आहे. याचे एक मोठे कारण म्हणजे लॉर्ड्सवर इशांतची चमकदार कामगिरी. वेगवान गोलंदाज इशांत शर्माने लॉर्ड्सवर सध्याच्या भारतीय संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने लॉर्ड्सवर 3 कसोटी खेळल्या आहेत तर 12 बळी घेतल्या आहेत. त्याच्यापाठोपाठ वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आहे. ज्याने लॉर्ड्सवर 2 कसोटी खेळून 5 बळी मिळवले आहेत. महमंद सिराजला कसोटी मधून बाहेर जावं लागू शकतं.

लॅार्ड्स खेळपट्टी रिपोर्ट

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. हे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जुने मैदान आहे. लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर एक रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. येथे वेगवान गोलंदाजांना भरपूर मदत मिळणे आवश्यक आहे. येथे फलंदाजी करणे थोडे कठीण जात असते. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय राहिल. पहिल्या सामन्यात पाऊस खलनायक ठरला होता. त्याचबरोबर इंग्लंडची राजधानी लंडन येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात पावसाची शक्यता कमी आहे. येथे पाच दिवस हवामान आल्हाददायक राहण्याची शक्यता आहे. 12 ऑगस्टपासून सामना सुरू होणार आहे. या दिवशी कमाल तापमान 23 अंश सेंटीग्रेड आणि किमान तापमान 13 अंश सेंटीग्रेड अपेक्षित आहे. सामन्याच्या पाचही दिवसांच्या तापमानाबद्दल बोलायचे झाले तर कमाल तापमान 23 अंश सेंटीग्रेड तर किमान तापमान 13 अंश सेंटीग्रेड असू शकते. त्यामुळे हा सामना प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp वर 'Online' दिसणं टाळायचंय? ही सेटिंग बंद करा, फॉलो करा 'हे' टिप्स

Sunday Horoscope Update : चूक केली असेल तर लगेच माफी मागा…; वाचा आजचे राशीभविष्य

Idli Recipe : रात्रीचा भात भरपूर उरलाय? झटपट बनवा मऊसर इडली

Nirmiti Sawant : निर्मिती सावंत यांचे छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक; डॅशिंग लूकनं वेधलं लक्ष, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT