Eng vs Ban world cup 2023: Saam tv
Sports

Eng vs Ban world cup 2023: इंग्लंडच्या दमदार फलंदाजीसमोर बांगलादेशी गोलंदाजांचा नागीण डान्स! विजयासाठी ३६५ धावांचं आव्हान

Eng vs Ban world cup 2023: इंग्लंडने धुव्वादार फलंदाजी करत बांगलादेश संघाला ३६५ धावांचं आव्हान दिलं आहे.

Vishal Gangurde

England vs Bangladesh World Cup Match:

विश्वचषक स्पर्धेत आज इंग्लंड विरुद्ध बांगलादेशचा धर्मशाला मैदानावर रंगतदार सामना सुरु आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी बांगलादेशविरुद्ध दमदार फलंदाजी केली. इंग्लंडने धुव्वादार फलंदाजी करत बांगलादेश संघाला ३६५ धावांचं आव्हान दिलं आहे. (Latest Marathi News)

बांगलादेशने नाणेफेक जिंकून इंग्लंडला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. इंग्लंडच्या फलंदाजांनी धमाकेदार सुरुवात केली. इंग्लंडने ५० षटकात ९ गडी गमावून ३६४ धावा कुटल्या.

बांगलादेशला आता जिंकण्यासाठी ३६५ धावा कराव्या लागणार आहेत. इंग्लंडकडून डेव्हिड मलानने १४० धावा कुटल्या. तर बांगलादेशच्या महेदी हसनने ८ षटकात ७१ धावा दिल्या. तसेच महेदीने ४ गडी बाद केले.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिल्या पॉवरप्लेमध्ये एकही गडी न गमावता ६१ धावा कुटल्या. डेव्हिड मलानने बांगलादेशच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने ३९ चेंडूत अर्धशतक झळकावले. मलाननंतर बेयरेस्टोने ५४ चेंडूत अर्धशतक ठोकलं.

डेव्हिडने ९१ चेंडूत शतक ठोकलं. इंग्लंडने ३३ व्या षटकात २०० धावा पूर्ण केल्या. जो रूटनेही ४४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. तर डाविडने १०७ चेंडूत १४० धावांची खेळी खेळली. मात्र, डेव्हिड हसनच्या चेंडूवर त्रिफाळाचीत झाला. बटलर देखील १० चेंडूत २० धावा करून बाद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney infection symptoms: किडनीमध्ये इनफेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही लक्षणं; खराब होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा

Maharashtra Live News Update: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT