afghanistan twitter
Sports

AFG vs ENG: पाकिस्तानात सुरक्षेचे तीन तेरा.. फॅन थेट मैदानात घुसला अन् अफगाणिस्तानच्या खेळाडूला... VIDEO

Afghanistan vs England: अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यानंतर एका फॅनने मैदानात प्रवेश केला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत बुधवारी मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या सामन्यात इंग्लंड आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात अफगाणिस्ताने इंग्लंडला धूळ चारत शानदार विजयाची नोंद केली. ३२६ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेला इंग्लंडचा डाव अवघ्या ३१७ धावांवर आटोपला.

इंग्लंडला हरवल्यानंतर अफगाणिस्तानचा सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानचे खेळाडू जल्लोष करताना दिसून आले आहेत. मैदानात खेळाडू जल्लोष करताना दिसून आले. तर स्टँड्समध्ये असलेले फॅन्स देखील डान्स करताना दिसून आले. यादरम्यान असं काही घडलं, ज्यामुळे पाकिस्तानात खेळाडूंच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

फॅन मैदानात घुसला अन्...

अफगाणिस्तानने इंग्लंडला हरवल्यानंतर, अफगाणिस्तान संघातील खेळाडू जोरदार जल्लोष करत होते. त्यावेळी अफगाणिस्तानचा एक फॅन सुरक्षारक्षकांना चकवा देत अफगाणिस्तानच्या खेळाडूंची भेट घेण्यासाठी मैदानात घुसला. तो खेळाडूंच्या अगदी जवळ पोहोचला होता. मात्र सुरक्षारक्षकांनी मोक्चाच्या क्षणी त्याला पकडलं आणि ताब्यात घेऊन मैदानाबाहेर नेलं. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान फॅनने मैदानात येण्याची ही पहिलीच वेळ नाही.

यापूर्वी न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रविंद्रला भेटण्यासाठी देखील एका फॅनने मैदानात प्रवेश केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. माध्यमातील वृत्तानुसार, रचिन रविंद्रला मैदानात घुसखोरी करुन मिठी मारणारा इस्लामी संघटनेचा सदस्य असल्याचं म्हटलं गेलं.

अफगाणिस्तानचा शानदार विजय

अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर अफगाणिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करण्यसाठी मैदानात उतरला होता. अफगाणिस्तानकडून फलंदाजी करताना इब्राहिम जादरानने सर्वाधिक १७७ धावांची खेळी केली. त्याचं दुहेरी शतक थोडक्यात हुकलं.

या खेळीच्या बळावर अफगाणिस्तानने ५० षटकअखेर ७ गडी बाद ३२५ धावा केल्या. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी ३२६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव ३१७ धावांवर आटोपला. हा सामना अफगाणिस्तानने ८ धावांनी आपल्या नावावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT