Jemimah Rodrigues’ Emotional Moment After India’s Semifinal Triumph Saam
Sports

महिला विश्वचषकात भारताचा विजय, जेमिमा रॉड्रिग्ज वडिलांना मिठी मारून रडली, मुंबईच्या लेकीचा भावुक क्षणाचा VIDEO

Jemimah Rodrigues’ Emotional Moment After India’s Semifinal Triumph: भारतानं ऑस्ट्रेलियावर मात करत महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय. जेमिमा रॉड्रिग्जची दमदार कामगिरी. विजयाच्या आनंदात जेमिमा वडिलांना मिठी मारून भावुक झाली.

Bhagyashree Kamble

  • ऑस्ट्रेलियावर मात करत भारताचा महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश.

  • महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्ज भावुक.

  • मैदानावर वडिलांना मिठी मारून रडली.

ऑस्ट्रेलियासारख्या सात वेळा विजेत्या संघाचा विजय रथ रोखत भारतीय महिला संघाने महिला विश्वचषक २०२५च्या अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत भारतानं ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला. या खेळात भारतीय क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत कौर या दोघींची कामगिरी कौतुकास्पद ठरली. जेमिमाने आपल्या जबरदस्त खेळीनं ऑस्ट्रेलियाला अक्षरश: गुडघे टेकायला लावले.

विजयानंतर संपूर्ण देशाच्या डोळ्यात आंनदअश्रू होते. महिला क्रिकेट टीमचं प्रत्येकानं कौतुक केलं. दरम्यान, सामना जिंकल्यानंतर मैदानावर भावनांचा पूर उसळला. जेमिमाला आंनद व्यक्त करताना अश्रू अनावर झाले. तिनं वडिलांना मिठी मारली. यावेळी जेमिमाच्या वडिलांनाही अश्रू अनावर झाले. हा हृदयस्पर्शी क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. याचा व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.

प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकल्यानंतरही जेमिमाला अश्रू अनावर झाले. तिनं रडतच मुलाखत दिली.

सेमीफायनलमध्ये भारतासमोर ३३९ धावांचं आव्हान होतं. जेमिमा रॉर्डिग्जनं उत्तम कामगिरी केली. जेमिमानं १३४ चेंडूंत १४ चौकारांसह नाबाद १२७ धावा ठोकल्या. भारतानं ४८.३ षटकांत ५ बाद ३४१ धावा करून घवघवीत यश मिळवलं. तसेच थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

जेमिमा रॉड्रिग्ज म्हणाली..

सामन्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज म्हणाली, 'सर्वात आधी मी देवाचे आभार मानेन. कारण ही कामगिरी मी एकटीनं करूच शकत नाही. मला आजच्या कठीण प्रसंगातून मला देवानेच बाहेर काढले आहे. या काळात माझे आई -वडील आणि कोचने माझ्यावर विश्वास ठेवला. मी सर्वांचे आभार मानते. गेले ४ वर्षे खूप कठीण गेले. पण आज जे घडलं, माझा त्यावर विश्वास बसत नाही'. असं म्हणत जेमिमाने आपल्या भावनांना वाट मोकळी करून सर्वांचे आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची धडक, 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा चारली धुळ

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT