'ना मी आतंकवादी, ना पैसे..' १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या माथेफिरूची मागणी काय? व्हिडिओतून दिली धमकी

Accused Shares Video After Keeping Children Captive: पवईतील आरए स्टुडिओमध्ये १७ मुलांना एका व्यक्तीनं ओलीस ठेवलं. ऑडिशनच्या नावाखाली डांबून ठेवलं. आरोपीनं व्हिडिओतून मागणी स्पष्ट केली.
Mumbai Powai Shock 17 Children Held Hostage in Powai Studio
Mumbai Powai Shock 17 Children Held Hostage in Powai StudioSaam
Published On

मुंबईतील पवईत आरए स्टुडिओमध्ये १७ मुलांना एका माथेफिरूनं डांबून ठेवलं. गेल्या ५ ते ६ दिवसांपासून या स्टुडिओमध्ये ऑडिशन सुरू होतं. ऑडिशनच्या नावाखाली आरोपीनं १५ वर्षांखालील १७ ते २० मुलांना डांबून ठेवल्याची माहिती आहे. हे प्रकरण समोर येताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपीला ताब्यात घेतलं आणि मुलांची सुखरूप सुटका केली. मात्र, आरोपीची नेमकी मागणी कोणती होती? त्यानं व्हिडिओ शेअर करून मागणीबाबत माहिती दिली.

आरोपी रोहित आर्यने मागणीबाबत व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत रोहितने मुलांना ओलीस ठेवण्यामागचं कारण सांगितलं, 'मी रोहित आर्य. आत्महत्या करण्याऐवजी मी एक प्लॅन तयार केला आणि काही मुलांना डांबून ठेवलं. माझ्या फार काही मागण्या नाहीत. फक्त नैतिक डिमांड आहेत. पण माझे काही प्रश्न आहेत. माझ्या प्रश्नांची मला उत्तरे हवी आहेत', असं रोहित आर्य म्हणाला.

Mumbai Powai Shock 17 Children Held Hostage in Powai Studio
मोठी बातमी! माजी उपमुख्यमंत्र्यांच्या घरात फूट; भावानं धरली भाजपची वाट, शरद पवार गटाला धक्का

'ना मी आतंकवादी आहे, ना माझी पैशांची मागणी आहे. मला काही लोकांशी संवाद साधायचा आहे. याच कारणामुळे मी या मुलांना एका खोलीत ओलीस ठेवलं. प्लॅन तयार करूनच मी मुलांना ओलीस ठेवलं. तुमच्याकडून जराही चूक झाली, तर मी ट्रिगर होईल. मी संपूर्ण जागेवर आग लावेन. स्वत: मी देखील आयुष्य संपवेन. मी आयुष्य संपवेन अथवा नाही. पण उगाच मुलांनाही याचा त्रास होईल. त्यांच्या मनावर आघात होईल', असं व्हिडिओत रोहित आर्य म्हणाला.

Mumbai Powai Shock 17 Children Held Hostage in Powai Studio
डिलिव्हरी बॉयकडून चारचाकीला धडक, जोडप्याला राग अनावर; तरूणाला चिरडलं, घटना CCTVत कैद

'या गोष्टीला मी जबाबदार नाही. या गोष्टीमागे अशा लोकांना जबाबदार धरा जे उगाच या गोष्टीला ट्रिगर करतील. माझी एवढीच मागणी आहे, एक कॉमन मॅन फक्त काही लोकांशी संवाद साधू इच्छित आहे. माझं बोलणं झाल्यानंतर मी स्वत: बाहेर येईन. मी एकटा नाही, माझ्यासोबत अन्य लोकही आहेत. खूप लोकांना त्रास आहे. या त्रासातून मला मार्ग काढायचा आहे. मला उगाच ट्रिगर करू नका. मला कुणालाही इजा पोहोचवायची नाही', असं रोहित आर्य व्हिडिओत म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com