Elena Rybakina, Wimbledon  saam tv
क्रीडा

Wimbledon 2022: विम्बल्डनचं जेतेपद मिळवून एलेना रायबाकिनानं रचला इतिहास

ग्रँडस्लॅम एकेरीचे विजेतेपद जिंकणारी ती पहिली कझाकिस्तानची खेळाडू ठरली आहे.

Siddharth Latkar

नवी दिल्ली : जिद्द आणि चिकाटीच्या जाेरावार कझाकिस्तानच्या एलेना रायबाकिनाने (Elena Raibakina) विम्बल्डन (Wimbledon) स्पर्धेत विजेतेपद (victory) पटकाविले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात एलेनाने ट्यूनिशियाच्या ऑन्स जबेराचा (3-6, 6-2, 6-2) असा पराभव केला. एलेनाचा जन्म रशियात झाला असून स्पर्धेच्या (Wimbledon 2022) आयोजकांनी यंदा रशिया (russia) आणि बेलारुसच्या खेळाडूंवर बंदी घातल्याने तिने कझाकिस्तानचं प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेपुर्वी ती रशियाचे प्रतिनिधित्व करीत असे. (Wimbledon 2022 Latest Marathi News)

ऑन्स जबेरने उपांत्य फेरीत तातयाना मारियावर (6-2, 3-6, 6-1) असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला हाेता. ग्रँड स्लॅम एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी ऑन्स ही पहिलीच आफ्रिका/अरब येथील महिला खेळाडू ठरली. एलेनाने सिमोन हालेपला हिचा (6-3, 6-3) असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली होती. तर ग्रँडस्लॅम एकेरीचे विजेतेपद जिंकणारी एलेना कझाकिस्तानची पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

दरम्यान सानिया मिर्झा हिला उपांत्य फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं. सानिया यंदा विम्बल्डन स्पर्धेत मिश्र दुहेरीत मेट पॅव्हिकच्या बरोबरीने खेळत होती. उपांत्य लढतीत नील स्कूप्स्की आणि डिसारे क्रॉझॅक जोडीने सानिया-मेट जोडीवर (4-6, 7-5, 6-4) असा विजय मिळवला.

आज (रविवार) निक कुर्यिगाससमोर नोव्हाक जोकोव्हिचचं (Novak Djokovic) आव्हान असणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Pawar News : धक्कादायक! रोहित पवारांचा निसटता विजय, लीड कमी झाल्याच्या धक्क्याने कार्यकर्त्याचा मृत्यू

Mumbai Indian Squad: मुंबईची पलटण तयार ! आगामी हंगामात या तगड्या प्लेइंग ११ सह उतरणार मैदानात

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे खरंच नाराज आहेत का? आठवलेंच्या दाव्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून ट्विस्ट

Nagpur Accident : पिकनिकला निघालेली शाळेची बस उलटली; एका विद्यार्थिनीचा मृत्यू, नागपुरातील दुर्दैवी घटना

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री होऊ नये - रामदास आठवले

SCROLL FOR NEXT