Betting App Case saam tv
Sports

Betting App Case: युवराज सिंहला ED ची नोटीस; 23 सप्टेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

ED notice to Yuvraj Singh: भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्टार खेळाडू युवराज सिंग याच्या अडचणीत वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयने त्याला समन्स बजावले असून, एका आर्थिक प्रकरणात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

ईडीने मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित प्रकरणात माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंह आणि रॉबिन उथप्पा यांना चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावले आहेत. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडीकडून दिलेल्या माहितीनुसार, रॉबिन उथप्पाला २२ सप्टेंबर रोजी युवराज सिंह यांना २३ सप्टेंबर रोजी दिल्लीतील ईडी मुख्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

ऑनलाइन सट्टेबाजी अॅपशी संबंध

हे प्रकरण ऑनलाइन सट्टेबाजी प्लॅटफॉर्म 1xBet शी संबंधित असून या माध्यमातून झालेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीत ईडीकडून कारवाई केली जात आहे. या प्रकरणात ईडीने याआधीही कारवाई केली होती. माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांची याआधी चौकशी झाली आहे. त्यामुळे आता एकूण चार माजी भारतीय क्रिकेटपटू या तपासात ईडीसमोर उपस्थित राहणार आहेत.

ईडीची चौकशी नेमकी कशासाठी?

क्रिकेटपटूंची 1xBet या बेटिंग अॅपशी काय भूमिका होती किंवा त्यांचे संबंध कसे होते हे ईडीकडून जाणून घेतलं जाणार आहे. युवराज सिंह किंवा रॉबिन उथप्पा यांनी या अॅपच्या जाहिरातीसाठी स्वतःची इमेज वापरली का आणि त्याबदल्यात कोणतेही मानधन स्वीकारले का याची चौकशी केली जाणार आहे.

आर्थिक आणि गैर-आर्थिक संबंधांची तपासणी

या अवैध जाळ्यात त्यांचा कोणताही आर्थिक किंवा गैर-आर्थिक सहभाग आहे का, याची चौकशी ईडीकडून केली जाणार आहे. याशिवाय अभिनेत्री उर्वशी रौतेला, जी 1xBet ची भारतातील ब्रँड अॅम्बेसेडर आहे, ती मात्र अद्याप नियोजित तारखेला हजर झालेली नाही.

रैना आणि धवन यांचीही चौकशी

याआधी या प्रकरणात माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्याकडूनही चौकशी करण्यात आली होती. दिल्लीमध्ये त्यांना या प्रकरणी प्रश्न विचारण्यात आले होते. फक्त क्रिकेटपटूच नव्हे, तर काही कंपन्या आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सदेखील ईडीच्या तपासाच्या कक्षेत आले आहेत.

करोडोंच्या फसवणुकीचा आरोप

ईडी सध्या अशा अनेक प्रकरणांची चौकशी करत आहे जी अवैध बेटिंग अॅप्सशी संबंधित आहेत. एजन्सीच्या मते हे अॅप्स केवळ बेकायदेशीरच नाहीत, तर त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर मनी लॉन्ड्रिंगसाठी होतो. या अॅप्सवर आरोप आहे की त्यांनी लाखो गुंतवणूकदार आणि युजर्सना करोडो रुपयांचा फटका दिला किंवा करचुकवेगिरी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

Maharashtra Government: आमदार-खासदारांसोबत कसं वागावं? अधिकाऱ्यांसाठी 9 कलमी राजेशाही फर्मान

अजित पवारांच्या आमदारावर अटकेची टांगती तलवार? राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Success Story: १० बाय १०च्या खोलीत फुलवली केशरची शेती, संभाजीनगरच्या लेकीचा यशस्वी प्रयोग

Maharashtra Politics: बड्या नेत्यांना हवं भाजपचं वाशिंग मशिन? मित्र पक्षांनाही भाजपची भुरळ

SCROLL FOR NEXT