R Ashwin and Ravindra Jadeja
R Ashwin and Ravindra Jadeja  Saam tv
क्रीडा | IPL

IND VS AUS:अश्विन-जडेजाच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा 'नागीण डान्स',५९ धावा देत ९ फलंदाज केले बाद

Saam TV News

IND VS AUS 2nd Test: दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवशी भारतीय संघातील फिरकी गोलंदाज आर अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या अप्रतिम गोलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला आहे.

या दोन्ही खेळाडूंनी मिळून तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या १० फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. (Latest Sports Updates)

अश्विन आणि जडेजासमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांची नाचक्की..

ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत आक्रमक खेळी करत १ गडी बाद ६१ धावा केल्या होत्या. मात्र तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही.

अवघ्या ५९ धावा करत ऑस्ट्रेलियाचे ९ फलंदाज माघारी परतले. या डावात रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा भारतीय संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४२ धावा खर्च करत ७ गडी बाद केले. ही त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. तर आर अश्विनने या डावात ५९ धावा खर्च करत ३ गडी बाद केले.

भारतीय संघाला विजयासाठी ११५ धावांचे आव्हान

ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून पहिल्या दिवशी २६३ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने २६२ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात १ धावेची आघाडी घेत, ऑस्ट्रेलिया संघ मैदानात उतरला.

मात्र दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला केवळ ११३ धावा करता आल्या. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला केवळ ११५ धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाला २-० ची आघाडी घेण्याची सुवर्णसंधी आहे.

पहिल्या सामन्यात देखील केली होती अप्रतिम कामगिरी...

रवींद्र जडेजाने या मालिकेतील पहिल्या सामन्यात देखील जोरदार कामगिरी केली होती. त्याने पहिल्या डावात २२ षटक गोलंदाजी करत ५ गडी बाद केले होते.

तर फलंदाजी करताना ७० धावांचे बहुमूल्य योगदान देखील दिले होते. तर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना त्याने १२ षटक गोलंदाजी करत २ गडी बाद केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM मोदींनी चार टप्प्यांत 270 चा जागांचा टप्पा ओलांडला, अमित शहा यांचा दावा

Eggs : उकडलेली अंडी किती दिवस टिकतात?

Singham Again Shooting In Jammu : 'सिंघम अगेन'च्या सेटवरून फायटिंगचा सीन व्हायरल; अजय- जॅकी एकमेकांना भिडले...

SRH vs PBKS: अखेरच्या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांची बॅट तळपली! हैदराबादसमोर विजयासाठी २१५ धावांची गरज

Today's Marathi News Live: पिंपरी चिंचवड शहरात आज पुन्हा वळवाच्या पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT