dhruv jurel with ms dhoni twitter
क्रीडा

Dhruv Jurel Record: ध्रुव जुरेलचा मोठा कारनामा! या रेकॉर्डमध्ये केली MS Dhoni शी बरोबरी

Dhruv Jurel Equals MS Dhoni Record: भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने मोठ्या रेकॉर्डमध्ये एमएस धोनीची बरोबरी केली आहे.

Ankush Dhavre

दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेत युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळत आहे. स्पर्धेतील ५१ व्या हंगामात युवा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने मोठा कारनामा करुन दाखवला आहे. त्याने एका खास रेकॉर्डमध्ये भारताचा माजी खेळाडू एमएस धोनीची बरोबरी केली आहे.

दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेत ध्रुव जुरेल (Dhruv jurel) इंडिया ए संघाचं प्रतिनिधित्व करतोय. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात त्याने एका डावात यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक झेल टीपण्याच्या बाबतीत, एमएस धोनीच्या (MS Dhoni) रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

ध्रुव जुरेलची धोनीच्या रेकॉर्डशी बरोबरी

बंगळुरुतील एम चिन्नास्वामीवनवर इंडिया ए आणि इंडिया बी हे दोन्ही संघ आमने सामने आले आहेत. या सामन्यातील दुसऱ्या डावात ध्रुव जुरेलने ७ कॅच पकडले आहेत. यापूर्वी २००४-०५ मध्ये इस्ट झोनकडून खेळताना वेस्ट झोनविरुद्ध झालेल्या सामन्यात एमएस धोनीनेही हा कारनामा केला होता. धोनीनेही ७ कॅच पकडले होते. यासह ध्रुव जुरेल संयुक्तरित्या अव्वल स्थानी पोहोचला आहे. एमएस धोनी आधी हा रेकॉर्ड सुनील बेंजामिनच्या नावावर होता. त्यांनी १९७३-७४ मध्ये दुलीप ट्रॉफीच्या हंगामात सेंट्रल झोनकडून खेळताना एकाच डावात ६ कॅच आणि १ स्टम्पिंग घेतली होती.

तसेच एस विश्वनाथ यांनी १९८०-८१ मध्ये साऊथ झोनकडून खेळताना एकाच डावात ६ कॅच पकडण्याचा कारनामा केला होता. या रेकॉर्डब्रेक कामगिरीदरम्यानत ध्रुव जुरेलने मुशीर खान, अभिमन्यू ईश्वरन, सरफराज खान,नितीश कुमार रेड्डी, साई किशोर आणि नवदीप सैनीला बाद केलं.

दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील एकाच डावात सर्वाधिक कॅच पकडणारे यष्टीरक्षक

एमएस धोनी (ईस्ट झोन) - २००४-०५ सेंट्रल झोनविरुद्ध खेळताना ७ कॅच

ध्रुव जुरेल (इंडिया ए) - २०२४-२५, इंडिया बी विरुद्ध खेळताना ७ कॅच

सुनील बेंजामिन (सेंट्रल झोन) - १९७३-७४, नॉर्थ झोन विरुद्ध खेळताना ६ कॅच

सदानंद विश्वनाथ (साउथ झोन) - १९८०-८१ मध्ये सेंट्रल झोन विरुद्ध खेळताना ६ कॅच

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेकजण मलब्याखाली दबले

Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अंबाबाईच्या दर्शनाला

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

SCROLL FOR NEXT