Nitish Kumar Reddy: एकच नंबर! नितीशने पकडला Duleep Trophy स्पर्धेतील सर्वोत्तम कॅच, VIDEO पाहिलात का?

Duleep Trophy 2024, Nitish Kumar Reddy Catch: भारताचा युवा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डीने शानदार कॅच घेतला आहे.
Nitish Kumar Reddy: एकच नंबर! नितीशने पकडला Duleep Trophy स्पर्धेतील सर्वोत्तम कॅच, VIDEO पाहिलात का?
nitish reddy twitter
Published On

दुलीप ट्रॉफी स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत अष्टपैलू खेळाडू नितीश रेड्डीला फलंदाजीत आणि गोलंदाजीत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. मात्र त्याने शानदार कॅच घेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तर झाले असे की, इंडिया ए संघाची फलंदाजी सुरु असताना, मयांक अगरवाल स्ट्राईकवर होता. त्यावेळी यश दयाल गोलंदाजी करत होता. यश दयालने मयांकला शॉर्ट लेंथवर चेंडू टाकला. या चेंडूवर मयांकने कट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा अंदाज चुकला. चेंडू बॅटचा कडा घेत दुसऱ्या स्लीपमध्ये गेला. त्यावेळी नितीश रेड्डीने डाइव्ह मारत शानदार कॅच घेतला. (Nitish Reddy Catch)

Nitish Kumar Reddy: एकच नंबर! नितीशने पकडला Duleep Trophy स्पर्धेतील सर्वोत्तम कॅच, VIDEO पाहिलात का?
IND vs BAN: केएल राहुलची सुट्टी, रिषभ पंतचं कमबॅक! बांगलादेशविरुद्ध या खेळाडूंना मिळू शकते संधी

या सामन्याबद्दल बोलायचं झालं. तर या सामन्यात इंडिया ए ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता .प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंडिया बी संघाकडून मुशीर खानने सर्वाधिक १८१ धावांची खेळी करत इंडिया बी संघाला सामन्यात कमबॅक करुन दिलं.

Nitish Kumar Reddy: एकच नंबर! नितीशने पकडला Duleep Trophy स्पर्धेतील सर्वोत्तम कॅच, VIDEO पाहिलात का?
Navdeep Singh: पॅरालिम्पिकमध्ये पेटला नवा वाद! इराणच्या खेळाडूचं गोल्ड मेडल हिसकावून भारतीय खेळाडूला का दिलं?

तर नवदीप सैनीने ५६ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या ३२१ धावांपर्यंत पोहोचवली. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंडिया ए संघाकडून कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

इंडिया ए चा पहिला डाव २३१ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात आघाडी घेऊन मैदानात आलेल्या इंडिया बी संघाने दुसऱ्या डावात १८४ धावा केल्या. यासह इंडिया ए संघाला विजयासाठी २७५ धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना इंडिया ए संघाने ५ गडी बाद ८२ धावांपर्यंत मजल मारली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com