India vs New Zealand ICC Champions Trophy Final Live Score  Saam Tv News
Sports

Virat Kohli : दिल के अरमा आसुंओ मैं बह गए; विराट आला न् गेला, कोहली स्वस्तात माघारी परतला

Ind vs NZ ICC Champions Trophy Final : भारताला दुसरा मोठा झटका विराट कोहलीच्या रुपात बसला आहे. विराट कोहली केवळ २ चेंडू खेळला, दुसऱ्या चेंडूत मिचेल ब्रेसवेलने त्याला पायचीत केलं.

Prashant Patil

दुबई : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्याचा थरार रंगलाय. या स्पर्धेची अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जातोय. या सामन्याचा टॉस न्यूझीलंड संघाने जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाचा रथ भारताने २५१ इतक्या धावांवर रोखला.

भारतीय संघाने नंतर फलंदाजी करत दोन फलंदाजाची विकेट पडली आहे. शुभमन गिलने ५० चेंडूमध्ये ३१ धावा केल्या. त्याला मिचेल सँटनरने त्याला झेलबाद केलं. याचदरम्यान, भारताला दुसरा मोठा झटका विराट कोहलीच्या रुपात बसला आहे. विराट कोहली केवळ २ चेंडू खेळला, दुसऱ्या चेंडूत मिचेल ब्रेसवेलने त्याला पायचीत केलं. तो केवळ एक धाव बनवू शकला, त्यामुळे चाहत्यांच्या चेहऱ्यावर निराशा उमटलीय.

दरम्यान, दुबईमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यात किवींनी २५१ धावा केल्या. भारताला जिंकण्यासाठी २५२ धावा कराव्या लागतील. भारतीय फिरकीपटूंनी न्यूझीलंडविरुद्ध उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि त्यांना २५१ धावांपर्यंत रोखले. न्यूझीलंडकडून सलामीला आलेले विल यंग आणि रचिन रवींद्र हे दोघेही चांगली फलंदाजी करत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून गेवराई नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर

Mahabharat: महाभारताचे पुरावे सापडले? कुरुक्षेत्रात सापडला रथ, महाकाय गदा?

Maharashtra Politics: सुजय विखेंनी दिले वडिलांना राजकारणाचे धडे,'विरोधकांपेक्षा गाडीत बसणाऱ्यांपासून सावध राहा'

Buldhana Crime: सकाळी-सकाळी डोकं फिरलं, सपासप कुऱ्हाडीने वार करत आई-बाबाला संपवलं; नंतर स्वतःला लावला फास

Maharashtra Politics: भाजप कुबड्या काढणार? भाजप अजितदादा-शिंदेंना रोखणार?

SCROLL FOR NEXT