divya deshmukh Saam tv
Sports

Divya Deshmukh : 'बुद्धीबळाची राणी' दिव्यावर पैशांचा वर्षाव; 'वर्ल्ड चॅम्पियन'ला किती रक्कम मिळाली? वाचा

divya deshmukh prize money : 'बुद्धीबळाची राणी' दिव्या देशमुखवर पैशांचा वर्षाव होत आहे. वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या दिव्या देशमुख स्पर्धा जिंकल्याने लाखो रुपये मिळणार आहे.

Vishal Gangurde

महाराष्ट्राच्या नागपूरची दिव्या देशमुखने २०२५ च्या FIDE विश्वचषक स्पर्धेत धमाकेदार विजय मिळवला आहे. दिव्याने वयाच्या 19व्या वर्षी इतिहास रचला आहे. जॉर्जियामधील बटुमी येथे झालेल्या FIDE महिला विश्वचषक स्पर्धेत दिव्याने भारतासाठी बुद्धिबळाच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण लिहिला आहे. विश्वचषक स्पर्धेत अजिंक्यपद मिळवल्यानंतर दिव्याावर पैशांचा वर्षाव झाला आहे. या स्पर्धेत वर्ल्ड चॅम्पियन दिव्या आणि उपविजेत्या कोनेरू हम्पीला देखील बक्षीसाची रक्कम मिळाली आहे.

दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी या दोघांचे मागील दोन सामने ड्रॉ झाले. दोघांमधील मूळ सामना १-१ गुणांनी बरोबरीत राहिला होता. तर रॅपिड राऊंडमध्ये दिव्या देशमुखने पहिल्या गेममध्ये आक्रमक खेळत कोनेरू हम्पीशी बरोबरी साधली. त्यानंतर रॅपिड राऊंडच्या दुसऱ्या गेममध्ये दिव्याने वर्चस्व गाजवत कोनेरुचा पराभव केला.

FIDE महिला विश्वचषक २०२५च्या अंतिम सामन्यात दिव्याने बाजी मारत ४२ लाख रुपये जिंकले. तर उपविजेत्या कोनेरु हम्पीला ३० लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. या दोघींनी आता कॅन्डिडेट्स' स्पर्धेसाठीही पात्रता मिळवली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून दिव्याचं कौतुक

विजेत्या दिव्या देशमुखचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कौतुक केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अतिशय आनंद आहे की दिव्या ही नागपूरची आहे. महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने बुद्धिबळाच्या जागतिक स्पर्धेत अजिंक्यपद प्राप्त केलं आहे. तिने स्पर्धा जिंकलेली आहे. तसेच ग्रँडमास्टरचा किताब देखील या ठिकाणी प्राप्त केला आहे'.

'खरं म्हणजे किशोरवयीन अशी पहिली खेळाडू आहे, जिने महत्त्वाच्या चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत. दुसऱ्यांदा तिने त्यामध्ये भाग घेतला. यापूर्वीही तिने भारताकरिता अनेक मेडल जिंकले आहेत. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये अतिशय उत्तम अशी कामगिरी तिने केली आहे. 23 गोल्ड मेडल जिंकले आहेत. त्यामुळे अतिशय होतकरू खेळाडू म्हणून पण तिच्याकडे पाहू शकतो, असे फडणवीसांनी म्हटलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोनेरू हम्पी यांचंही अभिनंदन केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ST Ticket Price: पूरग्रस्त महाराष्ट्राला दिलासा! १० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द, सरकारचा मोठा निर्णय

Pune Andekar Gang : आंदेकर टोळीचे पाय आणखी खोलात; व्यावसायिकाकडून उकळली ५.४ कोटींची खंडणी

CNG Project : साखर कारखान्यातून CNG निर्मिती; कोपरगावमधील साखर कारखाना ठरला देशातील पहिला

Cheque Bounce: चेक बाउन्स झाल्यास कुठे तक्रार करू शकतो; सुनावणीसाठी किती दिवस लागतात?

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ४ ऑक्टोबरला मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक

SCROLL FOR NEXT