glenn maxwell twitter/icc
क्रीडा

Glenn Maxwell: वानखेडेवर मॅक्सवेलचा वन मॅन शो! वाचा दुखापतग्रस्त असतानाही कसा अफगाणिस्तानच्या ११ खेळाडूंवर पडला भारी

Ankush Dhavre

Glenn Maxwell Double Century:

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानवर ३ गडी राखून विजय मिळवला. अफगाणिस्तानने हा सामना जवळ जवळ जिंकला होता मात्र शेवटी एकटा ग्लेन मॅक्सवेल संपूर्ण अफगाणिस्तान संघावर भारी पडला.

त्याने धावांचा पाठलाग करताना दुहेरी शतकी खेळी केली. या खेळीच्या जोरावर त्याने ऑस्ट्रेलियाला सेमी फायनलचं तिकीट मिळवून दिलं आहे.

या सामन्यात फलंदाजी करत असताना तो पाठीच्या दुखण्याने त्रस्त होता. त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास होता. तरीदेखील तो मैदानावर टिचून फलंदाजी करत होता. त्याला मैदानाबाहेर जाण्याचा सल्ला देण्यात आला.

मात्र त्याने माघार न घेता एका पायावर उभा राहून फटकेबाजी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. मॅक्सवेलने या सामन्यात १२८ चेंडूंचा सामना करत नाबाद २०१ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने २१ चौकार आणि १० षटकार मारले.

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २९१ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने ३ गडी राखून हे आव्हान पूर्ण केलं.

या धावांचा पाठलाग करताना १८.३ षटकात अवघ्या ९१ धावांवर ऑस्ट्रेलियाचे ७ फलंदाज तंबूत परतले होते. त्यावेळी असं वाटलं होतं की, अफगाणिस्तान हा सामना जिंकणार. नेमकं त्याच वेळी ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्सने मिळून भागीदारी करायला सुरुवात केली. या डावात कमिन्सने ६८ चेंडूंचा सामना करत १२ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. (Latest sports updates)

या विजयासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियाने ८ पैकी ६ सामने जिंकले आहेत. १२ गुणांसह ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

यासह ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारा तिसरा संघ ठरला आहे. या यादीत भारताचा संघ अव्वल स्थानी आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय, मराठवाडा-विदर्भात जोरदार पाऊस होणार; या जिल्ह्यांना अलर्ट

Rashi Bhavishya today : मनातील भावना जोडीदाराला शेअर कराल; तुमची रास यात आहे का?

Horoscope Today : भाग्य फळफळणारा आजचा दिवस, मामाच्या संमिश्र गोष्टी कानावर येतील; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

SCROLL FOR NEXT