Wrestlers Protest At Delhi ANI
क्रीडा

Wrestlers Protest : ब्रिजभूषण यांना मोठा झटका, नॅशनल चॅम्पियनशिपवर कुस्तीपटूंचा 'बहिष्कार'

Wrestlers Protest At Jantar Mantar In Delhi : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीगीर आक्रमक झाले आहेत.

Saam TV News

Wrestlers Protest At Jantar Mantar In Delhi : लैंगिक शोषणाचा आरोप करत दिल्लीतील जंतर-मंतरवर दिग्गज आणि ऑलिम्पियन कुस्तीपटूंचे आंदोलन सुरू असतानाच, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीगीर आक्रमक झाले आहेत.

गोंडाच्या नंदिनी नगरातील कुस्तीच्या मैदानात नॅशनल चॅम्पियनशिप खेळण्यासाठी गेलेले हरयाणा आणि हिमाचल प्रदेशातील अनेक खेळाडू सामने न खेळताच परतले आहेत.  (Latest Marathi News)

अर्धा डझनाहून अधिक खेळाडू हे सामने न खेळताच परतले आहेत. आम्ही स्वेच्छेने सामने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंना पाठिंबा म्हणून आम्ही सामने न खेळताच परतत आहोत, असं अनेक कुस्तीपटूंनी सांगितलं. आम्ही सर्वप्रथम जंतरमंतरवर आणि त्यानंतर घरी जाऊ, असे त्यांनी सांगितले.

या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र, हरयाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश यांसह अनेक राज्यांतून कुस्तीपटू आले आहेत. शुक्रवारी ब्रिजभूषण शरण सिंह या खेळाडूंच्या भेटीसाठी पोहोचले होते. त्यांनी या स्पर्धेचा आढावा घेतला. हे सर्व अॅथलिट माझ्यासोबत आहेत, असं ते म्हणाले होते.

दिल्ली येथील जंतरमंतरवर कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात धरणे धरले आहे. त्याचवेळी गोंडा येथे नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले हरयाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि पंजाबचे कुस्तीपटू परतत आहेत.

एका वृत्तसंस्थेला माहिती देताना खेळाडूंनी आपली प्रतिक्रिया दिली. कुस्तीपटू पूर्णपणे खचले आहेत. येथील व्यवस्था देखील राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसारखी नाही, असे ते म्हणाले.

'सीनिअर्सच्या पाठिशी उभं राहायचंय'

नॅशनल चॅम्पियनशिपसाठी हरयाणा, पंजाब आणि इतर राज्यांतून आले होते. ते सामने न खेळताच परतत आहेत. आमच्या सीनिअर्सच्या पाठिशी उभं राहायचं आहे. येथून परतल्यानंतर जंतरमंतरवर जाऊ आणि आमच्या सीनिअरना पाठिंबा देऊ, असा निर्धार या खेळाडूंनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Eknath Shinde: शिंदेंची ताकद वाढली! अपक्ष आमदारासाठी थेट हेलिकॉप्टरच पाठवलं

Eknath Shinde Press Conference: साष्टांग दंडवत! शिंदे- फडणवीस- पवार लाडक्या मतदारांसमोर नतमस्तक; पाहा VIDEO

Amit Thackeray: मुंबईत राज ठाकरेंना धक्का, अमित ठाकरेंचा पराभव; उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने मैदान मारलं

Maharashtra Politcs : सहानभुती संपली, मविआ हारली; आघाडीच्या पराभवाची कारणे काय? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT