delhi capitals playoffs scenario in ipl 2024 after dc vs mi match amd2000 twitter
Sports

IPL 2024 Playoffs: मुंबईच्या पराभवानं दिल्लीचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा! वाचा कसं असेल समीकरण

Playoffs Scenario For Delhi Capitals: मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने शानदार विजय मिळवला आहे. दरम्यान या विजयानंतर दिल्लीसाठी कसं असेल प्लेऑफमध्ये जाण्याचं समीकरण? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला १० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यातील पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघाचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. हा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहोचला आहे.

दिल्लीचा संघ प्लेऑफमध्ये जाणार का?

दिल्ली कॅपिटल्स संघाने आतापर्यंत आपले १० सामने खेळले असून केवळ ४ सामने शिल्लक आहेत. या ४ पैकी ३ सामने जिंकले तर दिल्लीचा संघ १६ गुणांपर्यंत पोहचू शकतो. असे झाल्यास दिल्लीला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल. मात्र तर चारही सामने जिंकले, तर दिल्लीचा संघ प्लेऑफमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार असेल. मात्र तरीदेखील दिल्लीला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल.

असा राहिलाय दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रवास..

रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने आतापर्यंत १० सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाला ५ सामने जिंकता आले आहेत. तर ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्लीने आतापर्यंत मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स संघाला दोनदा पराभूत केलं आहे.

यासह दिल्ली कॅपिटल्स संघाला कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. इथून पुढे दिल्लीचे ४ सामने शिल्लक आहेत. आता दिल्लीचा संघ विजय मिळवणार की नाही, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Fort: रायगडाचा महादरवाजा शत्रूला लांबून कधीच दिसू नये असा का बांधला होता?

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा हवालदारची जेलमध्ये रवानगी

Rajeev Verma: अमिताभ बच्चन यांचे साडू, प्रसिद्ध अभिनेते अचानक बॉलिवूडपासून झाले दूर; आता चालवतात हॉटेल

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

SCROLL FOR NEXT