Delhi Capitals Beat Rajasthan Royals in Super Over : दिल्ली कॅपिटल्सने सुपर ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने दिल्लीला १२ धावांचे लक्ष्य दिले होते. दिल्लीने हे आव्हान अवघ्या ४ चेंडूंमध्ये पार केले. केएल राहुलने संदीप शर्माच्या गोलंदाजीवर तीन चेंडूंमध्ये ७ धावा कुटल्या. त्यानंतर चौथ्या चेंडूवर ट्रिस्टन स्टब्सने षटकार मारून दिल्लीला सामना जिंकून दिला. सुपर ओव्हरमध्ये राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना ११ धावा केल्या होत्या. शिमरन हेटमायरने ४ चेंडूत ६ धावा केल्या. तर रियान पराग याने २ चेंडूवर ४ धावा केल्या. पराग आणि यशस्वी जयस्वाल दोघेही सुपरओव्हरमध्ये धावबाद झाले. दिल्लीने सहज सामना जिंकला.. पाहूयात सुपरओव्हरमध्ये काय काय झालं?
राजस्थानकडून हेटमायर आणि रियान पराग फलंदाजीसाठी उतरले. तर गोलंदाजीसाठी दिल्लीकडून मिचेल स्टार्क याने जबाबदारी संभाळली.
०.१ मिचेल स्टार्कने हेटमायरला पहिला चेंडू निर्धाव फेकला.
०.२ शिमरन हेटमायरने दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. मिचेल स्टार्कने यॉर्कर फेकला होता.
०.३ तिसऱ्या चेंडूवर शिमरन हेटमायरने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण मिचेल स्टार्कच्या यॉर्करवर फक्त एक धाव घेता आली.
०.४ - मिचेल स्टार्कने चौथा चेंडू नो फेकला. या चेंडूवर रियान पराग याने चार धावा वसूल केल्या.
०.४ - मिचेल स्टार्कने फ्री हिट अचूक टप्प्यावर फेकला. चेंडू विकेटकीपरच्या हातात गेला.. राहुलने धाव घेणाऱ्या रियान परागला बाद केले. राजस्थानने ४ चेंडूत १० धावा केल्या, एक विकेट घेतली.
०.५ - पाचव्या चेंडूवर हिटमायरने मोठा फटका मारला. दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला, पण यशस्वी जायस्वाल धावबाद झाला. एका षटकाच्या आतच दोन विकेट पडल्या. म्हणजे... सुपर ओव्हरमध्ये राजस्थानने ११ धावा केल्या. दिल्लीला विजयासाठी १२ धावांची गरज आहे.
दिल्लीला विजयासाठी १२ धावांचे आव्हान मिळाले होते. राजस्थानकडून गोलंदाजीची धुरा संदीप शर्मा याच्या खांद्यावर होती. तर दिल्लीकडून केएल राहुल आणि स्टब्स यांनी मोर्चा संभाळला होता.
०.१ - संदीप शर्माच्या पहिल्या चेंडूवर केएल राहुल याने दोन धावा घेतल्या.
०.२ - दुसऱ्या चेंडूवर केएल राहुल याने ऑफ साईडला शानदार चौकार ठोकला. दोन चेंडूत राहुलने सहा धावा चोपल्या. चार चेंडूवर ६ धावांची गरज..
०.३ - संदीप शर्माने तिसरा चेंडू यॉर्कर फेकला. त्यावर राहुलने एक धाव घेतली. ३ चेंडूमध्ये ५ धावांची गरज
०.४ - स्टब्सने संदीप शर्माच्या चेंडूवर शानदार षटकार ठोकत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील रोमांचक सामना बरोबरीत सुटला. शेवटच्या षटकात राजस्थानला विजयासाठी ९ धावांची गरज होती, पण त्यांना फक्त ८ धावाच करता आल्या, त्यामुळे दोन्ही संघाची धावसंख्या बरोबर झाली. राजस्थानकडून यशस्वी जायसवाल आणि नितीश राणा यांनी प्रत्येकी ५१ धावा, संजू सॅमसनने ३१ आणि ध्रुव जुरेलने नाबाद २६ धावा केल्या. दिल्लीकडून मिशेल स्टार्क, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना अभिषेक पोरेलच्या ४९ धावांच्या जोरावर २० षटकांत ५ बाद १८८ धावा केल्या होत्या. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने २ बळी घेतले. राजस्थान आणि दिल्ली दोन्ही संघांनी १८८ धावा केल्यामुळे निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.