RCB vs DC Saam tv
Sports

RCB vs DC : दिल्लीच्या विजयानंतर पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; कुणाला झाला नेमका फायदा?

RCB vs DC News : दिल्लीच्या विजयानंतर पॉइंट टेबलमध्ये उलटफेर झाला आहे. दिल्लीचा संघ जिंकल्यानंतर पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहाचला.

Vishal Gangurde

आरसीबी विरोधात दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली

आजच्या विजयाने दिल्लीच्या संघाला मोठा फायदा झाला

दिल्लीचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला

RCB vs DC : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची आयपीएलमध्ये सलग सहाव्यांदा जिंकण्याची संधी हुकली. दिल्ली कॅपिटल्स सलग दोन वेळा हरल्यानंतर दमदार कमबॅक केलं. दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या संघाने २० षटकात ८ गडी गमावून १७५ धावा केल्या. परंतु दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चांगली कामगिरी करत ६ विकेटने सामना जिंकला. दिल्ली कॅपिटल्सने आजचा सामना जिंकल्यानंतर पाचव्या स्थानावरून चौथ्यावर स्थानावर झेप घेतली आहे.

दिल्ली कॅपिटल्स मागील दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु दिल्लीच्या टीमने आरसीबीच्या विरोधात जोरदार कमबॅक केलं आहे. यंदाच्या स्पर्धेत आरसीबी संघाला दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबी संघ सहा सामन्यापैकी ४ सामन्यात विजय मिळवून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर पाच पैकी तीन सामने जिंकून दिल्ली दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

आरसीबीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. भुवनेश्वर कुमारने दिल्लीच्या संघाची सुरुवातीलाच दाणादाण उडवली. भुवनेश्वर कुमारने पाथुम निसांकाला बाद करून दिल्ली कॅपिटल्सला पहिला झटका दिला. भुवीने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून उतरलेल्या करुण नायरला पाचव्या चेंडूत बाद केलं. भुवनेश्वरने पुढे समीर रिझवीला देखील बाद केले. दिल्लीने अवघ्या १८ धावांवर तीन गडी गमावले.

दिल्लीचा डाव केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्सने सांभाळला. दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी ४४ चेंडूत ६९ धावांची भागीदारी रचली. केएल राहुलने दमदार फलंदाजी करत ३० चेंडूत अर्धशतक ठोकलं. पुढे क्रुणाल पंड्याने केएल राहुलला बाद करत दिल्लीला चौथा धक्का दिला. राहुलने ३४ चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५७ धावा करत बाद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT