IPL 2022 Auction Saam TV
Sports

Rishabh Pant Accident: रिषभ पंतच्या जागी कोण? दिल्लीच्या कर्णधारपदासाठी 'हे' खेळाडू आहेत प्रबळ दावेदार

भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंतचा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताच्या बातमीने क्रिडाविश्वात मोठी खळबळ माजली आहे, त्याच्या अपघातानंतर दिल्लीचे कर्णधारपद कोणाकडे असणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

IPL 2023: भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंतचा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताच्या बातमीने क्रिडाविश्वात मोठी खळबळ माजली आहे. दिल्लीहून डेहराडूनकडे जाताना हा अपघात घडला, ज्यामध्ये पंत गंभीररित्या जखमी झाला आहे. अपघातात पंतच्या डोक्याला, पाठीला तसेच पायाला मोठी दुखापत झाली आहे. या अपघातातून बरा होण्यासाठी बराच काळ जाणार असल्याने पंत २०२३ मधील आयपीएल खेळेल की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पंत दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार असून त्याच्या अनुपस्थितीत कोणत्या खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा दिली जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पाहूया कोण आहेत रिषभनंतर संघातील प्रमूख कर्णधारपदाचे दावेदार. ( IPL 2023)

डेविड वॉर्नर- रिषभ पंतच्या जागी कर्णधारपदासाठी प्रमुख दावेदार म्हणून धडाकेबाज फलंदाज डेविड वॉर्नरचे नाव आघाडीवर आहे. वॉर्नरने बराच काळ सनराईजर्स हैद्राबादच्या संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच त्याच्या नेतृत्वात हैद्राबाद संघाने आयपीएलचा किताबही जिंकला आहे. त्यामुळे त्याच्याकडे कर्णधारपदाचा मोठा अनुभव आहे.

पृथ्वी शॉ- संघाला भारतीय खेळाडूचं कर्णधार म्हणून घोषित करायचे असल्यास त्यासाठी पृथ्वी शॉचे नावाचा विचार केला जातो. पृथ्वी शॉ त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो, तसेच त्याने १९ वर्षाखालील विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्वही केले आहे.

मिचेल मार्श- डेविड वॉर्नर आणि शॉनंतर दिल्ली संघाच्या कर्णधारपदी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. मार्श ऑस्ट्रेलिया संघाचा उपकर्णधारही आहे, त्यामुळे तो सुद्धा दिल्लीच्या कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे.

अक्षर पटेल- पृथ्वी शॉ प्रमाणेच दिल्ली संघाच्या कर्णधारपदी भारतीय गोलंदाज अक्षर पटेलचीही वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पटेलने दिल्लीसीठी खेळताना चमकदार कामगिरी केली आहे, त्यामुळे निवड समिती त्याच्याकडेही कर्णधारपदाची धुरा देऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

भव्य विसर्जन मिरवणुकीत बाप्पावर फुलांचा वर्षाव; पाहा डोळ्यांची पारणं फेडणारं दृश्य|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : माजीं खासदरनवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याकडून गणरायाचे विसर्जन

Marriage Tips : नवरा-बायकोचं नातं तुटण्यापूर्वी व्हा सावध; या गोष्टींमुळे वाढतो घटस्फोटाचा धोका

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

SCROLL FOR NEXT