rishabh pant  twitter
Sports

IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचं ठरलं! रिषभ पंतसह या खेळाडूंना करणार रिटेन

Delhi Capitals Retention: आयपीएल २०२५ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघ रिषभ पंतला रिटेन करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. या मेगा ऑक्शनपूर्वी नव्या नियमांची घोषणा करण्यात आली आहे. आगामी स्पर्धेत सर्व फ्रेचांयझींना ६ खेळाडू रिटेन करण्याची अनुमती असणार आहे. ज्यात RTM कार्डचा देखील समावेश असणार आहे.

ही नियमावली जाहीर झाल्यानंतर कोणता संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार, अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. दरम्यान दिल्ली कॅपिटल्स संघाच्या ताफ्यातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ कर्णधार रिषभ पंतला रिटेन करणार असल्याची चिन्ह दिसून येत आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ या खेळाडूंना करु शकतो रिटेन

पार्थ जिंदाल म्हणाले की, निश्चितच रिषभ पंतला रिटेन केलं जाईल. नियम आता जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे टीम मॅनेजमेंट आणि सौरव गांगुली यांच्यात चर्चा केली जाईल. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल.'

ते म्हणाले की, ' रिषभ पंतला रिटेन केलं जाईल. या संघात अक्षर पटेल आहे जो उत्कृष्ट खेळाडू आहे. तसेच ट्रिस्टन स्टब्स, जेक फ्रेजर मॅकगर्क, कुलदीप यादव, अभिषेक पॉरेल, मुकेश कुमार आणि खलिल अहमदसारखे स्टार खेळाडू आहेत. आता ऑक्शनमध्ये काय होणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आम्ही नियमानुसार, ६ खेळाडूंना रिटेन करु शकतो. नियमानुसार आम्ही ६ खेळाडूंना रिटेन करु शकतो. यावर आधी चर्चा केली जाईल.'

आयपीएलच्या नियमानुसार, फ्रेचांयझींना ५ कॅप्ड खेळाडू, तर २ अन्कॅप्ड खेळाडूंना रिटेन करण्याची अनुमती देण्यात आली आहे. दिल्लीच्या संघात एकापेक्षा एक स्टार खेळाडू आले आणि गेले. यासह या संघाला अनुभवी प्रशिक्षकांचं मार्गदर्शनही लाभलं. मात्र या संघाला एकदाही आयपीएलची ट्रॉफी उंचावता आलेली नाही. यावेळी हा संघ मजबूत संघबांधणी करुन मैदानात उतरण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT