vipraj nigam twitter
Sports

DC vs SRH, IPL 2025: What a catch..मागच्या दिशेने धावत विपराजने घेतला भन्नाट कॅच; VIDEO एकदा पाहाच

Vipraj Nigam Catch To Dismiss Heinrich Klassen: दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात विपराज निगमने शानदार झेल घेतला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

सनरायझर्स हैदराबादचे फलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी ओळखले जातात. सलामीला फलंदाजीला येणाऱ्या अभिषेक शर्मापासून ते ११ व्या क्रमांकावर येणाऱ्या मोहम्मद शमीपर्यंत सर्वच फलंदाज बिग हिटर्स आहेत.

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात हैदराबादला सुरुवातीला मोठे धक्के बसले. मात्र त्यानंतर संघातील अनुभवी फलंदाज हेनरिक क्लासेनने मोठे फटके खेळून संघाची धावसंख्या १०० पार पोहोचवली. त्याला बाद करण्यासाठी विपराज निगमने शानदार झेल घेतला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

आयपीएल २०२५ स्पर्धेतील १० वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यात हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजीला उतरला आहे. हैदराबादच्या आक्रमक फलंदाजीचं वादळ रोखणं हे दिल्लीसमोरील सर्वात मोठं आव्हान होतं. हे आव्हान मिचेल स्टार्कने रोखलं. स्टार्कने सुरुवातीला हैदराबादच्या ३ फलंदाजांना माघारी धाडलं. मात्र त्यानंतर हेनरिक क्लासेनने संघाचा डाव सांभाळला.

विपराज निगमचा शानदार झेल

तर झाले असे की, प्रथम फलंदाजी करत असताना हेनरिक क्लासेन सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला. त्याने या डावात १९ चेंडूंचा सामना करत ३२ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने २ चौकार आणि २ षटकार मारले. त्यावेळी ११ वे षटक टाकण्यासाठी मोहित शर्मा गोलंदाजीला आला.

या षटकातील पाचव्या चेंडूवर क्लासेनने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चेंडू बॅटची कडा घेऊन हवेत गेला. त्यावेळी पॉईंटला क्षेत्ररक्षण करत असलेल्या विपराज निगमने मागच्या दिशेने धावत जाऊन शानदार झेल घेतला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

हैदराबादचा डाव १६३ धावांवर आटोपला

या सामन्यात हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. हैदराबादकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडची जोडी मैदानावर आली. मात्र अभिषेक शर्मा १, ट्रेविस हेड २२, इशान किशन, नितिश कुमार रेड्डी शून्यावर माघारी परतला. हैदराबादकडून फलंदाजी करताना अनिकेत वर्माने ४१ चेंडूंचा सामना करत सर्वाधिक ७४ धावांची खेळी केली. मात्र दिल्लीकडून गोलंदाजी करताना मिचेल स्टार्कने सर्वाधिक ५ गडी बाद केले. या कामगिरीच्या बळावर हैदराबादचा डाव अवघ्या १६३ धावांवर आटोपला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iPhone 17 Launch In India: १९ सप्टेंबरपासून iPhone 17 बाजारात विक्रीसाठी दाखल, जाणून घ्या खास अन् दमदार ऑफर्स

ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा नेपाळसारखी अवस्था करू; शेतकरी आक्रमक, सरकारला थेट इशारा

Nanded : फिरायला गेले अन् घात झाला, फोटो काढण्याच्या नादात...; पालकांचा मन हेलावणारा आक्रोश

Maharashtra Live News Update: जमीनमोजणीशिवाय दस्त नोंदणी नाही - चंद्रशेखर बावनकुळे

Asia Cup 2025: आज ओमानविरूद्ध मैदानात उतरणार सूर्या ब्रिगेड; बेंचवरील खेळाडूंना मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT