DC VS RR Highlights X
Sports

IPL 2025 : सामन्यात अंपायरसोबत राडा, व्हिडीओ व्हायरल अन् अडचणी वाढल्या; दिल्लीच्या कोचवर BCCI ची मोठी कारवाई

DC VS RR Highlights : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यादरम्यान दिल्ली संघाचे प्रशिक्षक मुनाफ पटेल यांनी फोर्थ अंपायरशी वाद घातला. तेव्हाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Yash Shirke

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर काल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा महामुकाबला रंगला. राजस्थानला दिल्लीने रोखत सुपर ओव्हरपर्यंत नेले. स्टार्कची गोलंदाजी आणि केएल राहुल-ट्रिस्टन स्टब्स यांच्या फलंदाजीने दिल्लीने सुपरओव्हरसह सामना जिंकला. पण या दरम्यान दिल्लीचे प्रशिक्षक आणि मैदानातील अंपायर यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.

मुनाफ पटेल हे सध्या दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजी विभागाचे प्रशिक्षक आहेत. कालच्या दिल्ली विरुद्ध राजस्थान या सामन्यात त्यांचा अंपायरशी वाद झाला. तेव्हाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भर सामन्यात अंपायरशी वाद घातल्याने मुनाफ पटेल यांच्यावर बीसीसीआयकडून कारवाई करण्यात आली आहे.

सामना सुरु असताना मुनाफ पटेल मैदानातील खेळाडूंना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. याला बाउंड्रीजवळ असलेल्या फोर्थ अंपायरने मनाई केली. यावरुन रागाच्या भरात मुनाफ यांनी अंपायरशी वाद घातला. त्याच्या नंतर बीसीसीआयने आयपीएलच्या आचारसंहितेनुसार मुनाफ पटेल यांना दंड ठोठावला. एका मॅचच्या मानधनातून २५ टक्के भाग दंड म्हणून आकारला जाणार आहे. यासोबत त्यांना डिमेरिट पॉईंट देखील देण्यात आला.

आयपीएलच्या कोड ऑफ कंडक्टचा भंग केल्याने मुनाफ पटेल यांच्यावर कारवाई झाली आहे. अंपायरशी वाद घातल्याने मुनाफ पटेल यांना दंड ठोठावण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओमुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान झालेल्या प्रकरणावरुन मुनाफ पटेल यांनी चूक स्वीकारुन माफी मागितल्याचेही म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्याच्या ग्रामीण भागात 62 रुपयांना मिळणार रॉकेल

MI vs RCB IPL 2026:मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक, मुंबईला घरच्या मैदानात RCBनं हरवलं!

करमाळ्यात मेंढपाळसहीत महिलेला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Acid Attack: पुन्हा अ‍ॅसिड हल्ला! दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी तरुणीच्या चेहऱ्यावर फेकलं अ‍ॅसिड सदृश रसायन

Ranjangaon: भीमाशंकरनंतर आता अष्टविनायक रांजणगाव महागणपती मंदिर बंद? काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT