DC vs RCB Final Match Saam tv
Sports

DC vs RCB Final Match Result : विराटला जे जमलं नाही, ते स्मृतीनं करुन दाखवलं; आरसीबीच्या पोरींनी कोरलं WPLचषकावर नाव

DC vs RCB Final Match News : दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरदरम्यान अरुण जेटली स्टेडियमवर अंतिम सामना झाला. या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने दिल्लीला धूळ चारली.

Vishal Gangurde

DC vs RCB Final Match :

वुमेन्स प्रिमियर लीग स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरदरम्यान अरुण जेटली स्टेडियमवर अंतिम सामना झाला. या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने दिल्लीला धूळ चारली. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने पहिल्यांदा वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये पहिल्यांदा सामना जिंकला आहे. (Latest Marathi News)

आरसीबीने वुमेन्स प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिट्सवर ८ गडी राखून विजय मिळवला. स्मृती मानधनाच्या नेतृत्वात आरसीबी फ्रेंचाइजीने मागील १७ वर्षात पहिल्यांदा स्पर्धेचा चषक जिंकला आहे. आरसीबीचा पुरुष संघ देखील एकदाही ट्रॉफी जिंकला नाही. मात्र, आरसीबीच्या महिला ब्रिगेडने ही कमाल करुन दाखवली आहे. (Latest Cricket News)

दुसरीकडे मेग लैनिंगच्या नेृत्वावातील दिल्ली संघ दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात पराभूत झाला आहे. या आधी मुंबई इंडियन्सनशी झालेल्या अंतिम सामन्यात दिल्लीचा पराभव झाला होता. त्यावेळी दिल्लीचा संघ ७ विकेटने पराभूत झाला होता.

दिल्लीची फलंदाजी ठरली फ्लॉप

वुमेन्स प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी निराशाजनक झाली. सुरुवातीला शेफाली आणि मेग लैनिंगने संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, ६४ धावानंतर दिल्लीचा संघ ढेपाळला.

दिल्लीने १८.३ षटकात ११३ धावाच कुटल्या. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या आरसीबीने १९ षटकात दोन गडी गमावून ११५ धावा ठोकत सामना खिशात टाकला. स्पर्धेचा अंतिम सामना जिंकत आरसीबीने चषकावर विजेतेपदाचं नाव कोरलं.

आरसीबीचा यशस्वी पाठलाग

दिल्लीने दिलेल्या ११४ धावांचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात चांगली झाली. सोफी डिवाइन आणि कर्णधार स्मृतीने घाई केली नाही. त्यांनी हळुवार संघाची धावसंख्या पुढे नेली. त्यांनी सुरुवातीच्या ६ षटकात २५ धावा कुटल्या. त्यानंतर सातव्या षटकात ४ चौकार लगावून एकूण १८ धावा कुटल्या. सोफीने २७ चेंडूत ३२ धावा केल्या. तिने डावात पाच चौकार आणि एक षटकार लगावला.

कर्णधार स्मृतीने ३९ चेंडूत ३१ धावा ठोकल्या. तिने डावात तीन चौकार लगावले. त्यानंतर रिचा आणि पॅरीने यशस्वी पाठलाग केला. पॅरीने ३५ धावा केल्या. आरसीबीला शेवटच्या षटकात ५ धावा हव्या होत्या. सुरुवातीच्या दोन चेंडूवर दोन धावा काढल्या. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर रिचाने चौका मारत सामना जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Maharashtra Live News Update: शक्तीपीठ महामार्गामुळे राधानगरी ,करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना बसणार फटका

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

Sweet Corn Dosa Recipe : पावसाळ्यात संध्याकाळचा नाश्ता होईल खास, १० मिनिटांत बनवा चटपटीत 'स्वीट कॉर्न डोसा'

Accident: भीषण अपघात! अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल, ४ वाहनांना धडक; ३६ प्रवासी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT