Hardik Pandya On Injury: 'इंजेक्शन घेतले, ५ दिवसांत कमबॅक करणार होतो, पण...',दुखापतीचा किस्सा सांगताना हार्दिक पंड्या भावुक

Hardik Pandya On World Cup Injury: बांगलादेश संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला गोलंदाजी करत असताना दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला गेले काही महिने संघाबाहेर राहावं लागलं आहे.
hardik pandya tells the story of world cup 2023 injury said i got injections on my ankle
hardik pandya tells the story of world cup 2023 injury said i got injections on my ankle saam tv news
Published On

Hardik Pandya News In Marathi:

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतून दुखापतीमुळे बाहेर पडावं लागलं होतं. त्याला सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली मात्र बांगलादेश संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला गोलंदाजी करत असताना दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला गेले काही महिने संघाबाहेर राहावं लागलं आहे. आता ४ महिन्यांनंतर तो आयपीएल स्पर्धेतून कमबॅक करणार आहे. दरम्यान आपल्या कमबॅकपूर्वी त्याने एक मोठा खुलासा केला आहे.

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला की,' मी टीम मॅनेजमेंटला सांगितलं होतं की, मी ५ दिवसात कमबॅक करेल. त्यानंतर मी घोट्यावर ३ इंजेक्शन टोचून घेतले. मला माझ्या घोट्यातून रक्त काढावं लागलं होतं. मी पेनकिलर घेत होतो. मला संघासाठी सर्व काही द्यायचं होतं. मी जितका जास्त जोर लावत होतो हे आणखी जास्त होत होतं. एक वेळ अशीही आली होती जेव्हा मला वाटलं होतं की, मी आणखी जोर लावला तर मला दिर्घ काळासाठी संघापासून दुर राहावं लागेल. जर संघासोबत राहण्याची १ टक्के जरी शक्यता असती तर मी ते केलं असतं.' (Cricket news in marathi)

hardik pandya tells the story of world cup 2023 injury said i got injections on my ankle
Gujarat Titans: IPL आधीच गुजरातला मोठा धक्का! संघातील विस्फोटक फलंदाज स्पर्धेतून बाहेर; कोचने सांगितलं कारण

तसेच तो पुढे म्हणाला की, 'मी जास्त जोर लावल्याने मला आणखी दुखापत झाली. त्यामुळे ठीक होण्यासाठी ३ महिन्यांहून अधिकचा वेळ लागला . मला व्यवस्थित चालता येत नव्हतं. तरी मी धावण्याचा प्रयत्न करत होतो. मी पेनकिलर घेत होतो. मी कमबॅक करण्याचा प्रयत्न करत होतो. देशासाठी खेळणं हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे.'

hardik pandya tells the story of world cup 2023 injury said i got injections on my ankle
IPL 2024: IPL मिळवून देणार टीम इंडियाचं तिकीट! T-20 WC मध्ये विराटसह या खेळाडूंना संधी मिळणं कठीण

आयपीएल स्पर्धेतून करणार कमबॅक..

हार्दिक पंड्या आयपीएल २०२४ स्पर्धेतून कमबॅक करताना दिसून येणार आहे. गेल्या २ हंगामात त्याने गुजरात टायटन्स संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी पार पाडली. दरम्यान आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वी झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला १५ कोटी देत ट्रेड केलं आहे. दरम्यान संघात आल्यानंर रोहितला कर्णधारपदारवरुन काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्यावर सोपवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com