DC vs KKR: करो या मरो च्या सामन्यात 'या' बदलासह दोन्ही संघ मैदानात उतरतील? Twitter
Sports

DC vs KKR: करो या मरो च्या सामन्यात 'या' बदलासह दोन्ही संघ मैदानात उतरतील?

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 (IPL 2021) व्या हंगामात आज होणाऱ्या सामन्यात दुसरा फायनलिस्ट मिळणार आहे.

वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 (IPL 2021) व्या हंगामात आज होणाऱ्या सामन्यात दुसरा फायनलिस्ट मिळणार आहे. आज म्हणजेच 13 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या पात्रता फेरीत दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs DC) यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. क्वालिफायर 2 जिंकणारा संघ आयपीएल 2021 च्या अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जशी (CSK) लढेल आणि पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर होईल.

जर आपण दिल्लीच्या संघाबद्दल बोललो, तर संघाने सर्व विभागांमध्ये चांगली कामगिरी केली आहे, परंतु जर संघाला या करो किंवा मरोच्या सामन्यात फलंदाजी बळकटी करायची असेल तर संघाचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) अतिरिक्त फलंदाज म्हणून स्टीव्ह स्मिथला (Stive Smith) संधी देऊ शकतो. पण जर मार्कस स्टोइनिस दुखापतीमधून सावरला असेल तर त्याला टॉम करन च्या जागेवर संधी दिली जाऊ शकते. आर अश्विनचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. अशा परिस्थितीत अमित मिश्राला संघात स्थान मिळू शकते.

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

शिखर धवन, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, आर अश्विन/अमित मिश्रा, कागिसो रबाडा, टॉम कुरन/ मार्कस स्टोईनिस, आवेश खान आणि अनरिक नोरखिया.

दुसरीकडे, जर आपण कोलकाता नाईट रायडर्सबद्दल बोललो तर कर्णधार इऑन मॉर्गनला संघ जैसे थे ठेवू शकतो. जर अष्टपैलू आंद्रे रसेल तंदुरुस्त असेल, तर तो कोणाच्या जागी संघात येईल, हे पाहण्यासारखे असेल. मात्र, सध्या रसेलला तंदुरुस्त आहे असे वाटत नाही. परदेशी खेळाडू केकेआरसाठी चांगली कामगिरी करत आहेत पण इयोन मॉर्गनची फलंदाजी चिंतेचे कारण आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन

शुभमन गिल, व्यंकेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इऑन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (wk), साकिब अल हसन, सुनील नारायण, लोकी फर्ग्युसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहेत रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

SCROLL FOR NEXT