DC vs GT Weather prediction delhi capitals vs gujarat titans weather report news in marathi amd2000 twitter
Sports

DC vs GT,IPL 2024: दिल्ली - गुजरात सामन्यावर पावसाचं सावट? जाणून घ्या कसं असेल हवामान

DC vs GT, Weather Update: आज होणाऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ भिडणार आहेत.

Ankush Dhavre

रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाला आयपीएल २०२४ स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. दिल्लीचा शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबाद संघाविरुदद्ध पार पडला होता. होम ग्राऊंडवर झालेल्या या सामन्यात दिल्लीला एकतर्फी पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तर दुसरीकडे गुजरात टायटन्सने गेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाचा पराभव केला आहे. आज होणाऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्सचा संघ आमने सामने येणार आहेत. दरम्यान कसं असेल हवामान? जाणून घ्या एकाच क्लिकवर.

कसं असेल हवामान?

दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना दिल्ली अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यावेळी आभाळ मोकळं असेल,असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पावसाची कुठलीही शक्यता नाही. क्रिकेट चाहत्यांना २०-२० षटकांचा सामना पाहायला मिळू शकतो. दिवसा तापमान ४० डिग्रीच्या आसपास असेल.

कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर हे दोन्ही संघ आतापर्यंत ४ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान दोन्ही संघांना २-२ सामने जिंकता आले आहेत. हा रेकॉर्ड पाहता दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ...

दिल्ली कॅपिटल्स -

पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, जेक फ्रेजर मॅकगर्क, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, रिषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्खिया, मुकेश कुमार, खलील अहमद.

गुजरात टायटन्स -

रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, डेविड मिलर, अजमतुल्लाह उमरजई, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, आर साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT