DC vs CSK match Saam tv
Sports

DC vs CSK : संजू सॅमसनची वादळी फलंदाजी; चेन्नई सुपर किंग्सचा दिल्लीविरोधात ऐतिहासिक विजय

DC vs CSK match : संजू सॅमसनने दिल्ली कॅपिटल्ससमोर वादळी फलंदाजी केली. चेन्नईने दिल्लीविरोधात सहज सामना जिंकला.

Vishal Gangurde

चेन्नई सुपर किंग्सची धमाकेदार कामगिरी

चेन्नईने दिल्ली कॅपिटल्सला केलं पराभूत

चेन्नईचा संजू सॅमसन फलंदाजी करताना चमकला

चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सविरोधात ऐतिहासिक विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सच्या विरोधात खेळताना संजू सॅमसनची बॅट तळपली. दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या १५६ धावांचं आव्हान चेन्नई सुपर किंग्सने सहज पूर्ण केलं. चेन्नईने ८ गडी राखून दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला.

अरुण जेटली स्टेडियमध्ये झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सला १५६ धावांचं आव्हान दिलं. दिल्लीने दिलेलं आव्हान सीएसकेने १७.३ षटकात पूर्ण केलं. चेन्नई सुपर किंग्सने यंदाच्या सीझनमध्ये १० पैकी ५ सामन्यात विजय मिळवलाय. तर या सामन्यात संजूने ५२ चेंडूत ८७ धावा कुटल्या. यात ७ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे.

सॅमसनने कार्तिकच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी रचली. कर्णधार ऋतुराज आणि उर्विल पटेलनेही जोरदार फलंदाजी केली. ऋतुराजने ६ तर उर्विल पटेलने १७ धावा केल्या. लुंगी एनगिडीने चौथ्या षटकात गायकवाड तर अक्षर पटेलने सातव्या षटकात उर्विलला बाद केलं.

दिल्लीने टॉस जिंकून फलंदाजी करताना सात गडी गमावून १५५ धावा कुटल्या. केएल राहुल (१२), पथुम निसंका (१९), नीतिश राणा(१५), करुण नायर (१३) आणि कर्णधार अक्षर पटेल (२) सारखे फलंदाज स्वस्तात माघारी परतले. दिल्ली कॅपिटल्सने ६९ धावांत पाच गडी गमावले. परंतु ट्रिस्टन स्टब्स (३८), समी रिझवी (नाबाद ४०) या दोघांनी चांगली फलंदाजी करत दिल्लीची धावसंख्या १५५ पर्यंत नेली.

दोघांनी सहाव्या विकेटसाठी ४७ चेंडूत ६५ धावांची भागीदारी रचली. रिझवीने ३४ चेंडूत नाबाद ४ षटकार लगावले. तर स्टब्सने ३१ चेंडू खेळत एक चौकार आणि दोन षटकार लगावले. दिल्लीने शेवटच्या ५ षटकात ५८ धावा कुटल्या. सीएसकेसाठी नूर अहमदने अकील हुसैन, मुकेश चौधरी, गुरजपनीत सिंह आणि जॅमी ओवरटन यांनी एक-एक विकेट घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

SCROLL FOR NEXT