david warner family saam tv
Sports

David Warner Wife: माझ्या पतीचे करिअर संपवण्याचा प्रयत्न..Warner च्या पत्नीचा खळबळजनक आरोप

Candice Warner: त्याची पत्नी कँडीस वॉर्नरने एक मोठा खुलासा करत क्रिकेट ऑस्ट्रेलियावर मोठा आरोप केला आहे.

Ankush Dhavre

David Warner: ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नर हा आक्रमक फलंदाजांपैकी एक आहे. तो आपल्या तुफान फटकेबाजीसाठी ओळखला जातो. क्रिकेटसह अनेकदा तो वाद विवादांमुळे देखील चर्चेत आला आहे. दरम्यान आता मॅटी जॉन्स पॉडकास्टमध्ये बोलताना त्याची पत्नी कँडीस वॉर्नरने एक मोठा खुलासा करत क्रिकेट ऑस्ट्रेलियावर मोठा आरोप केला आहे.

कँडीस वॉर्नरने म्हटले की, 'डेव्हिडला कोणताही आधार नव्हता. मुळात आम्ही दक्षिण आफ्रिकेतील हॉटेलमधून बाहेर पडलो तेव्हापासून डेव्हिडची कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न केला गेला. त्याला मदत करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता..'

जणू क्रिकेट ऑस्ट्रेलियाला असं म्हणायचं होतं की, स्वतःचा बचाव आता तू स्वतःच कर. तू आतापर्यंत दिलेल्या सेवेबद्दल धन्यवाद. तू परत कधीही देशासाठी क्रिकेट खेळू नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही तुलाच दोष देणार आहोत.' क्रिकेट ऑस्ट्रेलियाने डेव्हिडची कारकिर्द संपवण्याचा प्रयत्न केला," असं कँडिस वॉर्नर म्हणाली. (Latest sports updates)

काय आहे नेमकं प्रकरण?

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये तिसरा कसोटी सामना सुरु होता. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरने संघातील खेळाडू बॅनक्रॉफ्टला सँड पेपरच्या साहाय्याने चेंडूसोबत छेडछाड करण्यास सांगितले होते.

हे प्रकरण बाहेर येताच बॅनक्रॉफ्टवर क्रिकेट खेळण्यास ९ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. तर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथवर १ वर्ष बंदी घालण्यात आली होती. इतकेच नव्हे तर दोघांचे कर्णधार आणि उपकर्णधारपद काढून घेण्यात आले होते. काही महिन्यांनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हि कारवाई मागे घेण्याचा निर्णय घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT