GT Vs MI Match Updates Twitter
Sports

GT vs MI IPL 2023: नरेंद्र मोदी स्टेडियमवर धावांचा पाऊस; गिल-मिलरने मुंबईला धुतलं, गुजरातची २०७ धावांपर्यंत मजल

GT vs MI IPL 2023: गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी २०८ धावांचे आव्हान ठेवले आहे.

Satish Daud

GT vs MI IPL 2023: सलामीवीर शुभमन गिलच्या ३४ चेंडूत ५६ धावांची वादळी खेळी, त्याला डेव्हिड मिलर ४६ धावा आणि अभिनव मनोहरने दिलेल्या ४२ धावांच्या साथीच्या जोरदावर गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी २०८ धावांचे आव्हान ठेवले आहे. गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. (Latest Sports News)

कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय मुंबईच्या गोलंदाजांनी पावर प्लेमध्ये सार्थ ठरवला. युवा गोलंदाज अर्जून तेंडुलकरने तिसऱ्याच षटकात वृद्धिमान साहाला बाद केलं. साहा केवळ ४ धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या हार्दिक पांड्या स्वस्तात माघारी परतला पांड्याने १४ चेंडूत १३ धावांची खेळी केली. त्याला पियूष चावलाने बाद केलं.

कर्णधार हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर विजय शंकरने शुभमन गिलच्या साथीने गुजरातचा स्कोअरबोर्ड हलता ठेवला. मात्र, पियूष चावलाला मोठा फटका मारण्याच्या नादात विजय शंकरही बाद झाला. शंकरने १६ चेंडूत १९ धावांची खेळी केली. (IPL 2023)

एका बाजूने गडी बाद होत असताना दुसरीकडे शुभमन गिलने मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई सुरूच ठेवली. शुभमनने ३२ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. शुभमन मोठी खेळी करणार असे वाटत असताना, युवा डावखुरा गोलंदाज कार्तिकेयने त्याला बाद केलं. गिलने ३४ चेंडूत ५८ धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने ७ चौकार आणि एक षटकार ठोकला.

शुभमन गिल बाद झाल्यानंतर एकवेळ गुजरातची अवस्था ४ बाद १०१ अशी झाली होती. मात्र, त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या अभिनव मनोहरप आणि डेव्हिड मिलरने मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. अभिनव आणि मिलरने मुंबईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.

दोघांनी मिळून पाचव्या विकेट्साठी ७१ धावांची भागीदारी केली. १९ व्या षटकात मेरिडिथला मोठा फटका मारण्याच्या नादात मनोहर बाद झाला. त्याने २१ चेंडूत ४२ धावा कुटल्या. आपल्या खेळीत त्याने ३ चौकार आणि ३ षटकार ठोकले.

अखेरच्या काही षटकात राहुल तेवदियाने मिलरच्या साथीने मैदानावर जोरदार फटकेबाजी केली. त्यामुळे गुजरातला निर्धारित २० षटकात ६ गड्यांच्या २०७ मोबदल्यात धावा करता आल्या. मिलर अखेरच्या षटकांत ४६ धावा बाद झाला. मुंबईकडून पियूष चावला आणि बेहरनडॉर्फ प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT