IPL 2023, MI vs GT Match: मुंबईने टॉस जिंकला गुजरातची प्रथम फलंदाजी; रोहितचा हुकमी एक्का पुन्हा संघाबाहेर!

MI vs GT Match Updates: आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ३५ वा सामना आज रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्स संघात होत आहे.
MI vs GT Match IPL 2023 Mumbai Indians won the toss Gujarat Titans bat first Jofra Archer out of the team
MI vs GT Match IPL 2023 Mumbai Indians won the toss Gujarat Titans bat first Jofra Archer out of the team Saam TV
Published On

IPL 2023, MI vs GT Match Updates: आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ३५ वा सामना आज रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्स संघात होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात रोहित शर्माने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुजरातला प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे.

दरम्यान, दोन्ही संघांनी आपली प्लेईंग ११ जाहीर केली आहे. आजच्या सामन्यात मुंबईने दोन मोठे बदल केले असून यामध्ये वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला संघात स्थान देण्यात आलेलं नाहीये. त्याच्या जागी राईले मेरिडिथला खेळण्याची संधी देण्यात आली आहे. याशिवाय ह्रतिक शौकिनच्या जागी कुमार कार्तिकेयचा संघात समावेश करण्यात आला आहे. (Latest Sports News)

MI vs GT Match IPL 2023 Mumbai Indians won the toss Gujarat Titans bat first Jofra Archer out of the team
Virat Kohli Fined: WTC साठी टीम इंडियाची घोषणा होताच Virat वर मोठी कारवाई, कारणही आलं समोर

गेल्या काही दिवसांपासून जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्यामुळेच त्याचा मुंबईने आजच्या सामन्यातील प्लेईंग-११ मध्ये समावेश केला नसावा, असा अंदाज बांधला जातोय. गेल्या सामन्यात मुंबईला पंजाबकडून पराभव स्वीकारावा लागला होता.आता या महत्वाच्या सामन्यात जोफ्रा आर्चर खेळणार नसल्याने मुंबईच्या गोलंदाजांवर अधिकच दडपण असेल. (IPL 2023)

दुसरीकडे गुजरात टायटन्सने देखील या सामन्यासाठी आपली प्लेईंग-११ जाहीर केली आहे. गुजरातने मागचा सामना लखनौविरुद्ध जिंकला होता. या सामन्यात मार्क वुडचा समावेश नव्हता. आजच्या सामन्यातही मार्क वुड खेळणार नसून मागच्या सामन्यातील प्लेईंग-११ या सामन्यातही खेळवण्याचा निर्णय हार्दिक पांड्याने घेतला आहे.

गुजरात टायटन्स प्लेईंग ११ : वृद्धीमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, विजय शंकर, डेविड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, मोहम्मद शामी, नूर अहमद, मोहित शर्मा 

मुंबई इंडियन्स प्लेईंग ११ : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमरुन ग्रीन,  सूर्यकुमार यादव, टीम डेविड, नेहाल वढेरा, रायली मेरीडथ, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, पीयुष चावला, जेसन बेहनड्रॉफ

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com