CWG 2022
CWG 2022  Saam Tv
क्रीडा | IPL

CWG 2022 : टीम इंडिया गोल्ड मेडलपासून फक्त एक पाऊल दूर, इंग्लंडला लोळवून फायनलमध्ये धडक

साम वृत्तसंथा

CWG 2022 Indian Women Cricket Team Enters Final| मुंबई: कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघानं फायनलमध्ये धडक दिली आहे. भारतीय संघानं (Indian Team) सेमिफायनलमध्ये बलाढ्य इंग्लंडला लोळवून दिमाखात फायनलमध्ये प्रवेश करून पदक निश्चित केलं आहे. चुरशीच्या लढतीत भारतीय संघानं इंग्लंडला ४ धावांनी पराभूत केलं. आता टीम इंडियाची महिला ब्रिगेड सुवर्णपदकापासून फक्त एक पाऊल दूर आहे.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं कॉमनवेल्थ गेम्स २०२२ (CWG 2022) मध्ये महिला क्रिकेट स्पर्धेत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतानं (Indian Women Cricket Team) सेमिफायनमध्ये इंग्लंडला ४ धावांनी पराभूत केलं. प्रथम फलंदाजी करताना भारतानं ५ विकेट गमावून १६४ धावा केल्या होत्या.

भारतानं (Team India) दिलेलं १६५ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाला ६ विकेट गमावून १६० धावाच करता आल्या. आता भारतीय महिला क्रिकेट संघ सुवर्णपदकापासून अवघे एक पाऊल दूर आहे. (CWG 2022 Womens Cricket Semifinal )

स्मृती मंधानाचं धमाकेदार अर्धशतकी खेळी आणि त्यानंतर स्नेह राणा आणि दीप्ती शर्मा यांनी केलेल्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर भारतानं इंग्लंडवर विजय मिळवून फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला.

भारतानं प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट गमावून १६४ धावा केल्या. भारताकडून स्टार सलामीवीर स्मृती मंधाना हिने जबरदस्त फलंदाजी केली. तिने ६२ धावा कुटल्या. तर जेमिमा रॉड्रिग्ज हिने अखेरच्या षटकात तुफानी फलंदाजी करत टीम इंडियाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs DC : कर्णधार हार्दिक पुन्हा अपयशी; दिल्लीने १० धावांनी सामना घातला खिश्यात

Maharashtra Politics: प्रणिती शिंदेंविरोधात भाजपने निवडणूक आयुक्तांकडे दाखल केली तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?

Today's Marathi News Live : कुस्तीत आंतरराष्ट्रीय स्तरावर जायचं असेल तर मॅपमध्ये खेळावं लागेल; शरद पवार

Palghar News : सूर्या नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू; पालघरच्या कीराट जवळील घटनेने हळहळ

PM Modi Speech At Kolhapur : जगात भारी कोल्हापुरी... मराठीतून PM मोदींनी केली भाषणाची सुरूवात

SCROLL FOR NEXT