Kavya Maran Viral Video X
Sports

CSK च्या मिस्ट्री गर्लला विसराल अशी होती काव्या मारनची Reaction, नेमकं काय घडलं? Video Viral

IPL 2025 : चेन्नई विरुद्ध हैदराबाद हा सामना चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना पाहण्यासाठी हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन स्टेडियममध्ये पोहोचली होती. कालच्या सामन्यातला काव्या मारनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Yash Shirke

CSK VS SRH IPL 2025 : काव्या मारन ही सनरायजर्स हैदराबादची मालकीन आहे. आयपीएल २०२५ सुरु झाल्यापासून काव्या मारन चर्चेत आहे. हैदराबादच्या प्रत्येक सामन्यामध्ये ती हजर असते. कालच्या (२५ मार्च) चेन्नई विरुद्ध हैदराबाद हा सामना पाहण्यासाठी ती चेपॉक स्टेडियमवर पोहोचली होती. या सामन्यातला काव्या मारनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड मैदानात उतरले. शर्मा शून्यावर बाद झाला, तर हेडने फक्त १९ धावा केल्या. इशान किशनने एका बाजूने खिंड लढवली. तो ४४ धावा करुन माघारी परतला. यादरम्यान सीएसकेच्या गोलंदाजांकडून अनेक चुका झाल्याचे पाहायला मिळाले. हैदराबादकडून फलंदाजी करणाऱ्या कामिंदू मेंडिसला बाद करण्याची संधी नूर अहमदने गमावली. नो-बॉलमुळे मेंडिसला जीवनदान मिळाले.

नो-बॉलमुळे कामिंदू मेंडिसला फ्री हिट खेळण्याची संधी मिळाली. पण त्यात मेंडिसला मोठा शॉट मारता आला नाही. दमदार शॉट मारण्यासाठी हातची संधी गमावल्याने मेंडिसवर काव्या मारन काहीशी नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. तेव्हाची काव्या मारनची रिॲक्शन स्टेडियममधल्या कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली. काव्या मारनचा रिॲक्शन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सने १५४ धावा केल्या. १५५ चे लक्ष गाठताना हैदराबादचे सलामीवीर मैदानात उतरले. पण दोघेही लवकर बाद झाल्याने सामना चेन्नईकडे झुकला. पण इशान किशनच्या खेळीमुळे हैदराबादने कमबॅक केले. त्यानंतर कामिंदू मेंडिस आणि नितीश कुमार रेड्डी यांनी संयमी खेळी करत हैदराबादचा विजय पक्का केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT