rajat patidar x (twitter)
Sports

CSK vs RCB: सॉल्ट- पाटीदार चमकले, शेवटी टीम डेव्हिडने धुतलं; CSK समोर जिंकण्यासाठी इतक्या धावांचं आव्हान

CSK vs RCB Highlights: चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरु आहे.

Ankush Dhavre

चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला २० षटकअखेर १९६ धावा करता आल्या. चेन्नई सुपर किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९७ धावांची गरज आहे.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी फिल सॉल्ट आणि विराट कोहली ही जोडी मैदानावर आली होती. त्याने आरसीबीला ताबडतोड सुरुवात करुन दिली. त्याने १६ चेंडूंचा सामना करत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३२ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने ३० चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ३१ धावा करत माघारी परतला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना, देवदत्त पडिक्कलने २७ धावा केल्या.

आरसीबीकडून फलंदाजी करताना रजत पाटीदारने सर्वात मोठी खेळी केली. त्याने ३२ चेंडूंचा सामना करत ५१ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि ३ षटकार खेचले. आरसीबीची सुरुवात पाहता, या डावात हा संघ २०० धावांचा पल्ला गाठेल, असं वाटलं होतं. मात्र तेज तर्रार मिळाल्यानंतर आरसीबीला हवा तसा शेवट करता आला नाही.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

विराट कोहली, फिलिप सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कॅप्टन), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवूड, यश दयाल

चेन्नई सुपर किंग्स (Playing XI):

रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, रुतुराज गायकवाड (कॅप्टन), दीपक हुड्डा, सॅम करन, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मथीशा पथिराना, खलील अहमद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Svanidhi Yojana: सरकारची जबरदस्त योजना! बिझनेससाठी कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ८०,००० रुपये

MNS Rada : मराठी लोक भंगार.. परप्रांतीयाची जीभ घसरली, मनसेने शिकवला धडा, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात

पुणे मनपावरून महायुतीत महाभारत पेटणार? नव्या प्रभाग रचनेचा राष्ट्रवादीला फटका, शिवसेना-भाजपला फायदा

RBI Rule: रिझर्व्ह बँकने ATM च्या नियमांत केले बदल; या ट्रान्झॅक्शनवर द्यावे लागणार शुल्क

SCROLL FOR NEXT