csk vs pbks head to head record chennai super kings vs punjab kings record news in marathi amd2000 twitter
क्रीडा

CSK vs PBKS: चेन्नई- पंजाबमध्ये चुरशीची लढत! कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेट रेकॉर्ड

Ankush Dhavre

पंजाब किंग्जचा संघ 'करो या मरो'च्या लढतीत चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. हा सामना चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर रंगणार आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने आतापर्यंत खेळलेल्या ९ पैकी ५ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर पंजाब किंग्ज संघाला ९ पैकी केवळ ३ सामने जिंकता आले आहेत.

हे दोन्ही संघ आपला शेवटचा सामना जिंकून आले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज संघाने सनरायझर्स हैदराबाद संघावर ७८ धावांनी शानदार विजय मिळवला. तर पंजाब किंग्ज संघाने गेल्या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला होता. या संघाने गेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघावर आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला होता. शशांक सिंगच्या अर्धशतकी आणि जॉनी बेअरस्टोच्या शतकी खेळीच्या बळावर पंजाबने २६२ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.

असा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड..

चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला,तर दोन्ही संघ २८ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान चेन्नई सुपर किंग्ज संघाने १५ सामने जिंकले आहेत. तर पंजाब किंग्ज संघाने १३ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११... (CSK vs PBKS Playing XI prediction)

चेन्नई सुपर किंग्ज- अंजिक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोइन अली, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दिपक चाहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजूर रहमान, मथिशा पथिराना

इम्पॅक्ट प्लेअर - शार्दुल ठाकुर.


पंजाब किंग्ज- प्रभसिमरन सिंग,जॉनी बेअरस्टो, राइली रुसो , जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सॅम करन (कर्णधार), शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत बराड, हर्षल पटेल,कगिसो रबाडा, हरप्रीत सिंग

इम्पॅक्ट प्लेअर- अर्शदीप सिंग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT