CSK vs LSG  Saam Digital
Sports

CSK vs LSG :धोनीची पुन्हा एकदा तुफानी खेळी; चेन्नईचं लखनौसमोर १७७ धावांच लक्ष्य

IPL 2024/CSK vs LSG : अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर लखनौ सुपरजायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये आयपीएलचा सामना होत आहे.लखनौने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने १७७ धावांच लक्ष्य लखनौसमोर ठेवलं आहे.

Sandeep Gawade

अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर लखनौ सुपरजायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये आयपीएलचा सामना होत आहे.लखनौने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने १७७ धावांच लक्ष्य लखनौसमोर ठेवलं आहे. चेन्नईचा निम्मा संघ ९५ धावाचं तंबूत परतला होता, मात्र धोनीने पुन्हा एकदा तुफानी खेळी करत संघाला मजबूत धावसंख्या उभारण्यात मोलाचं योगदान दिलं आहे. लखनौ सुपरजायंट्सने आयपीएल 2024 मध्ये चांगली सुरुवात केली होती मात्र शेवटचे दोन सामने गमावले आहेत. तर चेन्नई सुपर किंग्जकने 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत.

चेन्नई सुपर किंग्जकडून रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी यांनी चांगली कामगिरी केली. जडेजाने 40 चेंडूत 57 धावा केल्या. तर धोनीने 9 चेंडूत नाबाद 28 धावा केल्या. मोईन अलीनेही 20 चेंडूत 30 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जला 7 सामन्यांमध्ये तिसरा पराभव स्वीकारावा लागला आहे. लखनौने 7 सामन्यांमध्ये चौथा विजय मिळवला आहे. मात्र तरीही गुणतालिकेत संघ पाचव्या स्थानावर कायम आहे.

रवींद्र जडेजाचे नाबाद अर्धशतक आणि महेंद्रसिंग धोनीच्या शानदार खेळीच्या जोरावर चेन्नई सुपरजायंट्सने लखनऊ सुपरजायंट्ससमोर विजयासाठी १७७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने २० षटकांत ६ बाद १७६ धावा केल्या. जडेजाने ४० चेंडूत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद ५७ धावा केल्या. त्याचबरोबर धोनीने नऊ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद २८ धावा केल्या. तसेच धोनीने यष्टीरक्षक फलंदाज आयपीएलमध्ये ५००० धावाही पूर्ण केल्या. लखनऊकडून क्रुणाल पांड्याने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT