hardik pandya and ms dhoni  saam tv
क्रीडा

CSK vs GT, IPL Final 2023: ठरलं तर! गुजरातच जिंकणार फायनल, सामन्यापूर्वीच हार्दिकने वाढवलं धोनीचं टेन्शन

Hardik Pandya Record: आयपीएल २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे.

Ankush Dhavre

CSK VS GT Final: आयपीएल २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे. हा सामना ठरलेल्या वेळापत्रकानुसार रविवारी खेळवला जाणार होता. या सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर जय्यत तयारी देखील केली गेली होती. मात्र पावसाने या सामन्यावर पाणी फेरलं.

त्यामुळे हा सामना आज खेळवला जाणार आहे. हा सामना आज संध्याकाळी ७:३० वाजता रंगणार आहे. दरम्यान हार्दिक पंड्याची अंतिम सामन्यातील कामगिरी एमएस धोनीची झोप उडवू शकते.

अंतिम सामन्यात हार्दिकचा शानदार रेकॉर्ड...

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वखाली खेळणारा गुजरात टायटन्स संघ सलग दुसऱ्यांदा आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. हे गुजरात टायटन्स संघाचे दुसरे हंगाम आहे. पहिल्या हंगामात गुजरात टायटन्स संघाने राजस्थान रॉयल्स संघाला पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातर्ली होती.

तर हा हार्दिक पंड्याचा गुजरात टायटन्स संघासाठी खेळताना दुसरा अंतिम सामना असणार आहे. मात्र हार्दिक पंड्यासाठी अंतिम सामना खेळण्याची आणि तो जिंकण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. तर यापूर्वी देखील तो ४ वेळेस विजेत्या संघाचा भाग राहिला आहे. (Latest sports updates)

हार्दिक पंड्या ठरणार गुजरातसाठी लकी?

हार्दिक पंड्याचा अंतिम सामन्यातील रेकॉर्ड पाहिला तर, तो ५ वेळेस अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. या पाचही सामन्यांमध्ये हार्दिक पंड्याचा संघ विजयी ठरला आहे. तो ४ अंतिम सामन्यांमध्ये ( २०१५,२०१७,२०१९ आणि २०२०) मुंबई इंडियन्स संघाचा भाग राहिला आहे.

हे चारही सामने मुंबईने जिंकले आहेत. तर पाचव्या हंगामात तो गुजरात टायटन्स संघाकडून खेळत होता. या हंगामातही गुजरात टायटन्स संघ विजयी झाला होता. आता हार्दिक पंड्या सहाव्यांदा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ही आकडेवारी पाहता असं म्हटलं जात आहे की, गुजरात टायटन्स संघ चेन्नईला पराभूत करत दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घालू शकतो.

आज रंगणार अंतिम सामना..

रविवारी अहमदाबादमध्ये पावसाने तुफान बॅटिंग केली. त्यामुळे हा सामना आज खेळवला जाणार आहे. रविवारी रात्री ११ वाजता पाऊस थांबला. मात्र सामना खेळण्यासाठी योग्य असं मैदान तयार करण्यासाठी कमीत कमी १ तासांचा अवधी लागणार होता.

त्यामुळे खेळाडू, प्रशिक्षक आणि सामना अधिकाऱ्यांनी मिळून सामना रिझर्व्ह डेच्या दिवशी खेळवण्याचा निर्णय घेतला होता. सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करणारा गुजरात टायटन्स संघ दुसरे जेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

तर दहाव्यांदा अंतिम फेरीत जाणारा चेन्नईचा संघ पाचवे जेतेपद मिळवण्याचा प्रयत्नात असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: छगन भुजबळ तातडीने मुंबईला रवाना

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

Maharashtra Election Result: पुणेकरांची पसंती कोणाला? पुण्यातील २१ आमदार पाहा एका क्लिकवर

Maharashtra Election : 'इंजिन' धावलंच नाही! राज ठाकरेंच्या मनसेच्या पराभवाची कारणं काय?

SCROLL FOR NEXT