CSK vs MI, IPL 2025 Chennai Super Kings Ball Tampering Controversy  
Sports

MI विरोधात CSK कडून बॉल टॅम्परिंग? ऋतुराज अन् खलीलच्या व्हिडीओनं खळबळ

CSK vs MI, IPL 2025 : धोनीच्या चेन्नईवर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला जात आहे. ऋतुराज गायकवाड आणि खलील अहमद यांच्या व्हिडीओनं सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

Namdeo Kumbhar

CSK vs MI, IPL 2025 Chennai Super Kings Ball Tampering Controversy : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नई सुपरकिंग्सने मुंबईचा (CSK vs MI) पराभव करत आयपीएलच्या १८ व्या हंगामाची सुरूवात दणक्यात केली. पहिल्याच सामन्याच चेन्नईने मुंबईचा चार विकेटने पराभव केला. चेन्नईच्या चाहत्यांकडून हा विजय साजरा केला जात असतानाच एका व्हिडीओने मात्र खळबळ उडवली. आयपीएल २०२५ च्या पहिल्याच सामन्यानंतर चेन्नईवर (CSK) बॉल टॅम्परिंगचा आरोप केला जात आहे. ऋतुराज गायकवाड आणि खलील अहमद यांच्या मैदानातील व्हिडीओनंतर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला जात आहे. या व्हिडीओत चेंडूसोबत छेडछाड केल्याचा आरोप केला जात आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून संतापजनक प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

व्हिडीओत नेमकं काय आहे ?

मुंबईविरोधातील सामन्यात खलील अहमद (Khaleel Ahmed) गोलंदाजी करत होता. त्यावेळी कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) त्याच्याकडे पोहचला. त्यावेळी खलील अहमद आपल्या खिशातून काहीतरी काढत असल्याचे दिसतेय. त्यावेळी कॅमेरा खलीलच्या पाठीवर असतो, त्यामुळे स्पष्ट काही दिसत नाही. पण पुन्हा व्यवस्थित पाहिल्यानंतर खलील खिशातून चेंडूच काढत असल्याचे दिसतेय. पण ऋतुराज गायकवाड याने दिलेल्या प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाते. त्यानंतरच बॉल टॅम्परिंगचा (CSK Ball Tampering Controversy) आरोप होत आहे.

पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ -

खलील अहमद आणि ऋतुराज गायकवाड यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दोन्ही खेळाडू चेंडूसोबत छेडछाड करत असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसतेय. पण व्यवस्थित पाहिल्यानंतर प्रकरण क्लिअर होते. सोशल मीडियावर आरोप नेहमीच होतात. पण सत्य कधीकधी वेगळेच असते. चेन्नईवर होत असलेला बॉल टॅम्परिंगच्या आरोपात कोणतेही तथ्य दिसत नाही. दरम्यान, चेन्नईवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. आयपीएलमधील सर्वात यशस्वी असलेला संघ २०१६ आणि २०१७ या हंगामात नव्हताच. सट्टा आणि आतील माहिती लीक केल्याप्रकरणी दोन वर्षांची कारवाई करण्यात आली होती.

चेन्नईची दणक्यात सुरूवात -

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नईने आयपीएल १८ ची दणक्यात सुरूवात केली. पहिल्याच सामन्यात चेन्नईने मुंबईचा ४ विकेटने पराभव केला. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड, रचिन रविंद्र आणि नूर अहमद यांनी शानदार खेळी केली. मुंबईचे दिग्गज चेन्नईच्या गोलंदाजीसमोर ढेपाळले. रोहित, तिलक, सूर्या ही दिग्गज फलंदाजाची फळी ढेपाळली. मुंबईकडून पदार्पण करणारा विघ्नेश यानं शानदार गोलंदाजी करत चेन्नईच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT