क्रीडा

CSK साठी वाईट बातमी; IPLच्या सामन्यांपूर्वी महेंद्रसिंग धोनीचं वाढलं टेन्शन, काय आहे कारण

IPL 2024: आयपीएल 2024 चा पहिला सामना २२ मार्च रोजी, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या संघात होणार आहे. बेंगळुरूमधील चिदंबरम स्टेडियमवर होईल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

IPL 2024 Csk Vs Rcb Match MS Dhoni:

एमएस धोनीने टीम इंडिया आणि आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून वेगवेगळ्या कठीण परिस्थितीमध्ये चोख भूमिका पार पाडलीय. धोनीकडे असलेल्या कौशल्यामुळे एमएस अनेक सामन्यांमध्ये यशस्वी झालाय. तर काही सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागलाय. संघ कठीण परिस्थितीत असताना त्याने त्यांच्या कौशल्यांचा उपयोग करत विजय मिळवलाय.(Latest News)

दरम्यान आयपीएल २०२४ च्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध मैदानात उतरवताना बेंगळुरूच्या आव्हानाला कसे सामोरे जाणार हे पाहावे लागेल. धोनीने या हंगामातही पुन्हा एकदा आपल्या संघाला यश मिळून देणार अशी खात्री आहे, पण त्या आधी त्याच्या समोर एक आव्हान म्हणजे त्याच्या संघातील २ खेळाडू सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळणार नाहीत.

संघाचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि युवा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना दुखापतीमुळे स्पर्धेतील किमान पहिल्या ३-४ सामन्यांसाठी उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे धोनी त्यांच्या जागी कोणत्या खेळाडूंना मैदानात उतरवेल, हे पाहाणं रंजक ठरेल? न्यूझीलंडचा फलंदाज कॉनवेने गेल्या वर्षी ६०० धावा केल्या होत्या, ज्यामुळे तो CSK चा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला होता. त्याने रुतुराज गायकवाडला साथ देत उत्कृष्ट खेळी खेळली होती.

त्याच्या जागी चेन्नईकडे दोन पर्याय आहेत - अजिंक्य रहाणे आणि रचिन रवींद्र, जो स्वतः न्यूझीलंडचा अफलातून फलंदाज म्हणून ओळखला जातो. भारताचा दिग्गज फलंदाज अजिंक्य रहाणेला आयपीएलमध्ये सलामीचा अनुभव आहे, मात्र तो गेल्या काही महिन्यांपासून चांगल्या फॉर्ममध्ये खेळताना दिसला आहे. पण गेल्या आयपीएलमध्ये त्याने धोनीच्या नेतृत्वाखाली येताच त्याने इतिहास घडवला. त्यामुळे रहाणेला तिसऱ्या क्रमांकावर खेळवल्यास संघासाठी फायद्याचं ठरू शकतं.

मथीशा पथिरानाची या खेळाडूची संघामध्ये जागा घेणे खूप कठीण आहे. त्याची बॉलिंग स्टाईल काहीशी श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज 'लस्सिथ मलिंगा' याच्यासारखी आहे. अशा परिस्थितीत या जागेवर धोनीला कोणत्याही गोलंदाजाचा संघात समावेश करून घेईल. माहितीनुसार, बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानला ही जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

SCROLL FOR NEXT