jasprit bumrah yandex
Sports

Cricketers Birthday Today: बड्डे आहे भावांचा! आज एकाच दिवशी आहे या ५ भारतीय क्रिकेटपटूंचा वाढदिवस

Indian Cricketers Birthday Today: आज एक नव्हे, तर ५ भारतीय क्रिकेटपटूंचा वाढदिवस आहे.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना अॅडलेडच्या मैदानावर सुरु आहे. गेल्या सामन्यात संघाबाहेर राहिलेला रोहित शर्मा या सामन्यात कमबॅक करताना दिसून आला आहे.

दरम्यान आजचा दिवस हा भारतीय संघाकडून खेळत असलेल्या २ खेळाडूंसाठी अतिशय स्पेशल असणार आहे. कारण या खेळाडूंचा आज वाढदिवस आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी जसप्रीत बुमराह मैदानात उतरला आहे. तर रविंद्र जडेजाला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. हे दोघेही आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत.

जडेजाला गेल्या सामन्यातही प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलं नव्हतं. तर जसप्रीत बुमराह गेल्या सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने पहिला कसोटी सामना २९५ धावांनी आपल्या नावावर केला होता.

जडेजाबद्दल बोलायचं झालं, तर त्याचा जन्म ६ डिसेंबर १९८८ ला जामनगर जिल्ह्यातील नवागम घेडमध्ये झाला. तर जसप्रीत बुमराहचा जन्म ६ डिसेंबर १९९३ ला अहमदाबादमध्ये झाला.

या खेळाडूंचाही आहे वाढदिवस

रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराहसह आणखी ३ भारतीय खेळाडू आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत. जडेजा आणि बुमराह हे भारतीय संघाचा भाग आहेत, तर उर्वरीत २ खेळाडू हे वर्तमान भारतीय संघाचा भाग नाहीत.

हे ३ खेळाडू करुण नायर, आरपी सिंग आणि श्रेयस अय्यर आहेत. श्रेयस अय्यरचा जन्म ६ डिसेंबर १९९४ ला झाला. तर करुण नायरचा जन्म ६ डिसेंबर १९९१ ला झाला आणि आरपी सिंगचा जन्म ६ डिसेंबर १९८५ ला झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

SCROLL FOR NEXT