Shubman Gill Sara
Shubman Gill Sara Saam TV
क्रीडा | IPL

Shubman Gill Sara : 'सारा भाभी जैसी हो...', खोडकर प्रेक्षकांनी शुभमन गिलला चिडवलं, VIDEO व्हायरल

Satish Daud-Patil

मुंबई : भारतीय संघाचा (Team India) युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल सध्या चर्चेत आहेत. गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत तुफानी खेळी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने हैदराबाद येथील मैदानावर तुफानी खेळी करत द्विशतक झळकावलं. त्यामुळे क्रिकेट जगतासह सोशल मीडियावर फक्त त्याच्याच नावाची चर्चा सुरू आहे. (Latest Marathi News)

अशातच, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये शुभमन गिल हा सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना प्रेक्षकांनी त्याला पाहून 'सारा-सारा'च्या घोषणा दिल्या आहेत. हा व्हिडीओ इंदोरमधील मैदावरचा असल्याचं सांगितलं जातंय.

व्हिडिओत नेमकं काय आहे?

व्हायरल झालेला हा व्हिडीओ भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यातील आहे. हा सामना इंदोर येथील मैदानावर खेळवला गेला होता. या सामन्यात शुभमन गिलने दमदार फलंदाजी करताना मैदानावर चौकार षटकांराचा पाऊस पाडून प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं होतं. सामन्यात गिलने शतक झळकावलं होतं.

दरम्यान, मैदानावर क्षेत्ररक्षणासाठी उतरलेल्या शुभमन गिलला पाहून (Sport News) प्रेक्षकांनी सारा-सारा नावाच्या घोषणा दिल्या. खट्याळ प्रेक्षक इतक्यावरच थांबले नाही तर, त्यांनी 'हमारी भाभी कैसी हो. सारा भाभी जैसी हो.' असं म्हणत शुभमनला चिडवण्याचा प्रयत्न केला.

प्रेक्षकांच्या या घोषणाबाजीकडे शुभमनने लक्ष दिलं नाही. मात्र, जेव्हा या घोषणा विराट कोहलीच्या कानावर पडल्या, तेव्हा त्याने भन्नाट रिअँक्शन दिली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कोण आहे सारा?

शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या रिलेशनशिपच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर नेहमी होत असतात. मात्र, हा व्हिडीओ व्हायरल होताच या चर्चांना अधिकच उधाण आलं आहे. सारा तेंडुलकर भारतीय संघाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडूलकर याची कन्या आहे. याशिवाय शुभमनचं नाव सारा अली खानसोबत देखील जोडलं जातंय. मात्र, शुभमन कुणाच्याही रिलेशनमध्ये नसल्याचं दिसतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Crime : तामिळनाडूहुन कल्याणला आलेली चोरट्यांची टोळी गजाआड; १२ गुन्हे उघडकीस

Today's Marathi News Live : हे अग्निवीर सरकार, त्यांना पेन्शनही नाही मिळणार; पटोलेंची केंद्र सरकारवर टीका

Sharad Pawar News | अजित पवार परतल्यास स्विकारणार? शरद पवारांचे मोठे विधान

Housing Tips: नवीन घरी शिफ्ट होताय; ठेवा 'या' गोष्टी काळजी

Vijay Wadettiwar News | कसाबमुळे करकरेंचा मृत्यू नाही? काँग्रेस नेते वडेट्टीवार यांचा दावा

SCROLL FOR NEXT