Kipling Doriga  x
Sports

Cricketer Became Robber : दोन वर्ल्डकप खेळणारा क्रिकेटपटू बनला दरोडेखोर, कोर्टाने सुनावली मोठी शिक्षा

Kipling Doriga Robbery Charges : दोन वर्ल्डकप स्पर्धांमध्ये सहभागी झालेला क्रिकेटपटू दरोडेखोर झाल्याची धक्कादायका घटना समोर आली आहे. दरोड्याच्या प्रकरणी क्रिकेटपटूला कोर्टाने शिक्षा सुनावली आहे.

Yash Shirke

  • क्रिकेटपटू किपलिंग डोरिगा दरोड्याच्या प्रकरणात दोषी ठरला.

  • कोर्टाने गंभीर आरोपांमुळे जामीन अर्ज फेटाळून त्याला कारागृहात पाठवले.

  • या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

Cricket : क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन वर्ल्डकप खेळणारा क्रिकेटपटू दरोड्याच्या प्रकरणाता दोषी आढळला आहे. कोर्टाने या खेळाडूला शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर पोलिसांनी या क्रिकेटपटूला ताब्यात घेतले आहे. दरोड्याच्या आरोपांखाली कारवाई झालेल्या खेळाडूचे नाव किपलिंग डोरिगा असे आहे. तो पापुआ न्यू गिनीचा क्रिकेटपटू आहे.

ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडे असलेल्या पापुआ न्यू गिनी या बेटावर ही घटना घडली आहे. दरोडा प्रकरणात पापुआ न्यू गिनीचा क्रिकेटपटू किपलिंग डोरिगा दोषी आढळला आहे. दरोड्याची गंभीर घटना सोमवार, २५ ऑगस्ट रोजी सेंट हेलियर्स परिसरात घडली होती. या प्रकरणामुळे क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

दरोडा प्रकरणी क्रिकेटपटू किपलिंग डोरिगाला बुधवारी (२७ ऑगस्ट) सकाळी मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला दोषी ठरवले. मॅजिस्ट्रेट कोर्टाने हे प्रकरणी खासगी कोर्टासाठी गंभीर आहे असे म्हणत हे प्रकरण रॉयल कोर्टात पाठवले. काल २८ नोव्हेंबर रोजी किपलिंग डोरिगाला रॉयल कोर्टात हजर करण्यात आले. त्याचा जामीन अर्ज कोर्टाने नाकारला आणि कारागृहात पाठवून दिले.

२०२१ आणि २०२४ या दोन टी-२० वर्ल्डकप स्पर्धांमध्ये किपलिंग डोरिगाने पापुआ न्यू गिनी संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने देशाच्या राष्ट्रीय संघासाठी त्याने ९७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने ३९ वनडे सामन्यांमध्ये ७३० धावा केल्या आहेत. याशिवाय ४३ टी-२० सामन्यांमध्ये त्याने ३५९ धावा केल्या होत्या. विकेटकीपर म्हणून त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ४९ कॅच आणि ११ वेळा खेळाडूंना स्टंपआउट केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Plan Change: जिओकडून मोठा धक्का! स्वस्त प्लॅनमध्ये केली मोठी कपात, ग्राहकांच्या सेवांवर परिणाम

Samsung AI Home: तुमचं घर होणार आणखी स्मार्ट; सॅमसंग AI Home च्या मदतीने लाइट्सपासून एसीपर्यंत सर्व काही आपोआप नियंत्रित

Kopargaon Crime : कोपरगाव शहरात दोन गटात राडा; रात्रीच्या सुमारास दगडफेक व हाणामारी, ६३ जणांवर गुन्हा दाखल

Badshah Photos: सुजलेला डोळा अन् मलमपट्टी; 'बादशाह'वर झाली शस्त्रक्रिया, सेटवर घडली होती भयंकर घटना

Maharashtra Live News Update: कोस्टल रोड टनलमध्ये गाडीला आग; वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT