Ravi Shastri - Rahul Dravid saam tv
Sports

Ravi Shastri News : ब्रेकची गरजच काय ? राहुल द्रविडवर भडकले रवी शास्त्री

न्यूझीलंडविरुद्ध टी २० आणि वनडे मालिकेसाठी दिग्गज खेळाडूंसोबतच हेड कोच राहुल द्रविड यालाही विश्रांती देण्यात आली आहे.

Nandkumar Joshi

Team India News : भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत. वर्कलोड व्यवस्थापनासाठी संघातील वरिष्ठ खेळाडूंना काही मालिकांसाठी विश्रांती दिली जात आहे. न्यूझीलंडविरुद्ध टी २० आणि वनडे मालिकेसाठी दिग्गज खेळाडूंसोबतच हेड कोच राहुल द्रविड यालाही विश्रांती देण्यात आली आहे. यावरुनच टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्रीही भडकले आहेत. त्यांनी द्रविडच्या या विश्रांतीच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

टी २० वर्ल्डकप स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट संघ (Team India) न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण याच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राहुल द्रविडला यापूर्वी आयर्लंड आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठीही विश्रांती देण्यात आली होती. तेव्हाही लक्ष्मणकडे ही जबाबदारी दिली होती. मात्र, रवी शास्त्रींच्या म्हणण्यानुसार प्रशिक्षकाला विश्रांतीची गरजच नाही. (Cricket News)

द्रविडच्या ब्रेकवर रवी शास्त्रींनी उपस्थित केला सवाल

रवी शास्त्री यांनी प्राइम व्हिडिओला दिलेल्या मुलाखतीत परखड मत मांडलं. माझा ब्रेकवर विश्वास नाही. मी प्रशिक्षक असताना संघ आणि खेळाडूंना समजून घेत होतो. कारण सर्व गोष्टी माझ्या नियंत्रणाबाहेर जायला नको.

खरं सांगायचं तर तुम्हाला ब्रेक कशाला हवा? तुम्हाला आयपीएलच्या मोसमात दोन-तीन महिने ब्रेक मिळतोच. कोच म्हणून इतका ब्रेक खूपच आहे. याव्यतिरिक्त प्रशिक्षकानं नेहमीच आपल्या संघासोबत असायला हवं, मग तो कुणीही असो असं माझं मत आहे, असं रवी शास्त्री म्हणाले.

'इंग्लंडच्या पावलावर पाऊल ठेवावं'

टी २० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या कामगिरीवरही रवी शास्त्री यांनी आपलं मत मांडलं. मी काही उणिवा काढत नाही. पण आता टीम इंडियाकडे संधी आहे. त्यांनी खेळाडूंची भूमिका ठरवावी. मॅच विनर कोण आहे हे ओळखावे.

इंग्लंडनेही तसेच केले. त्यांनी २०१५ नंतर योग्य बदल केले. जर सिनिअर खेळाडूंना बाहेर बसवण्याची आवश्यकता भासली तर तेही करावे. भारत सुद्धा हे सहज करू शकतो. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपासून त्याची सुरुवात करायला हवी, असं शास्त्री म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neem Leaves: कडुलिंबाची पाने आहेत गुणकारी; त्वचा, केसांच्या समस्येसह मधुमेहावर ठरेल वरदान

UPI Cash Withdrawal: कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही UPI द्वारे आता घरीच कॅश मिळणार?

Maharashtra Live News Update: नाशिकमधील वाघाडी नाला फुटला; गोदाघाट परिसरात शिरलं पाणी

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; ट्रकची RTO विभागाच्या गाडीसह ५ वाहनांना धडक

Chhagan Bhujbal: बेनामी मालमत्ता, कोर्टाचा दणका, छगन भुजबळ पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात

SCROLL FOR NEXT