T Natarajan in isolation after testing positive for Covid-19 
क्रीडा

IPL ला काेराेनाचे ग्रहण; SRH चा नटराजन पाॅझिटीव्ह

वृत्तसंस्था

अमिराती : सनरायझर्स हैदराबाद संघातील वेगवान गोलंदाज टी नटराजन याची काेविड १९ ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे नटराजन यास संघापासून वेगळे ठेवण्याचा सल्ला वैद्यकीय पथकाने दिला आहे. याबराेबरच त्याच्या संपर्कातील सहा खेळाडूंना तूर्तास विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. cricket-news-ipl-2021-dc-vs-srh-t-natarajan-tested-covid-19-positive-ahead-of-sunrisers-hyderabad-match-against-delhi-capitals-sml80

सनरायझर्स हैदराबादला आज आयपीएलच्या ३३ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळायचे आहे. दरम्यान टी नटराजन याला काेविड १९ ची लागण झाल्याने T Natarajan in isolation after testing positive for Covid-19 त्याच्या संपर्कातील विजय शंकर - खेळाडू, विजय कुमार - टीम मॅनेजर, श्याम सुंदर जे - फिजिओथेरपिस्ट, अंजना वन्नन - डॉक्टर, तुषार खेडकर - रसद व्यवस्थापक, पेरियासामी गणेशन - नेट बॉलर यांना विलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे.

जवळच्या संपर्कांसह उर्वरित खेळाडूंच्या काेविड १९ च्या आरटीपीसीआर RT-PCR चाचण्यांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान आज रात्रीचा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे होईल असे संयाेजकांनी कळविले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

SCROLL FOR NEXT