बांगलादेशच्या सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रविवारी भारत विरुद्ध बांगलादेश असा सामना रंगला. भारतीय महिला क्रिकेट संघाने ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना खेळला. या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशच्या संघाचा ४४ धावांनी पराभव केला आहे. हा सामना भारतीय फलंदाज हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळण्यात आला. या बांगलादेशमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेत भारतानी १-० अशी आघाडी घेतली आहे.
भारतीय महिला संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय खेळाडूंनी निर्घारित २० षटकार मारत १४५ धावा केल्या. लक्षाचा पाठलाग करत बांगलादेशच्या संघाने २० षटकांत १०१ धावा करण्यास पात्र ठरले. रेणुका सिंग आणि पूजा वस्त्रकार यांच्या धारदार गोलंदाजी समोर बांगलादेशच्या संघाचे फलंदाज टिकू शकले नाही. रेणुका सिंगने ३ तर पुजा वस्त्रकारने २ गडी बाद करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात रेणुका सिंग 'प्लेअर ऑफ दि मॅच' ठरली होती.
बांगलादेशच्या संघाचे पहिल्या २९ धावांमध्ये ३ गडी बाद झाले होते. अशा परिस्थितीमध्ये बांगलादेशच्या सांघाची कर्णधार निगार सुलताना हिने अर्धशतकीय खेळी खेळून संघाला विजयाच्या वाटेवर न्हेण्याचा प्रयत्न केला पण बांगलादेशच्या संघाला त्याचा फायदा उचलता आला नाही. सुलतानाने ४८ चेंडूमध्ये ५१ धावांची खेळी खेळली. या सामन्यात तिने ५ चौकार आणि १ षटकारही लगवला. भाारतीय संधाच्या अफलातून गोलंदाजीमुळे बांगलादेशच्या महिला संघाला शेवटचे ५ फटकात २३ धावा करता आल्या.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली करण्याचा निर्णय घेतला मात्र, भारतीची स्फोटक फलंदार स्मृती मानधना काही खास कामगीरी करू शकली नाही. स्मृतीने केवळ 9 धावा केल्या. सामन्यादरम्यान, शेफाली वर्माने 22 चेंडूत 31 धावांची तर यास्तिका भाटियाने 29 चेंडूत 36 धावांची खेळी खेळली.बारतीय सांघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने 22 चेंडूत 30 आणि ऋचा घोषने 23 धावांचे संघासाठी योगदान दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.