Rohit Sharma Captaincy
Rohit Sharma Captaincy  Saam TV
क्रीडा | IPL

Rohit Sharma Captaincy : रोहित शर्माचे कर्णधारपद धोक्यात? BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

Satish Daud-Patil

Rohit Sharma Captaincy : टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनल सामन्यांत इंग्लंडने भारताचा १० गडी राखून पराभव केला. या पराभरावाबरोबरच टीम इंडियाचं (Team India)   विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाच्या स्टार फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी जी कामागिरी केली, त्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. (Sports News)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी T20 विश्वचषक (T20 World Cup)  पाहता कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. यामध्ये प्रथम टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती बीसीसीआयच्या खात्रीलायक सूत्रांनी दिली. रोहित शर्माच्या हातून टीम इंडियाची सूत्रे काढून घेणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे.

रोहितच्या (Rohit sharma) जागी अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या भविष्यात टीम इंडियाच्या टी-20 ची जबाबदारी सांभाळताना दिसू शकतो. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घ्यायचे की त्याकडेच ठेवायचे याचा निर्णय न्यूझीलंड मालिकेनंतर होईल.

पुढील T20 विश्वचषक दोन वर्षांनी होणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय रोहित शर्माला पर्याय म्हणून हार्दिक पांड्याला तयार करत आहे. एका क्रिडावाहिनीच्या वृत्तानुसार, बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले की, 'आम्ही टी-२० विश्वचषकाची मजबूत तयारी केली होती. रोहितच्या इच्छेनुसार, निवड समितीने संघाची निवड केली होती. काही खेळाडूंच्या दुखापतींमुळे आमच्या योजनांवर नक्कीच परिणाम झाला. त्यामुळे आम्हाला अशा समस्यांना तोंड द्यावे लागले. आता आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील.

पराभवानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?

'आम्ही सुरूवातीला थोडे नर्व्हस होतो, पण विजयाचं श्रेय इंग्लंडच्या ओपनरना द्यावं लागेल, त्यांनी चांगला खेळ केला. आम्हाला योग्य दिशेने बॉलिंग करणं गरजेचं होतं. इंग्लंडच्या बॅटरना मोठे शॉट खेळण्यापासून रोखण्याची गरज होती, पण यात आम्ही अपयशी ठरलो. आमच्या रणनितीची योग्य अंमलबजावणी आम्हाला करता आली नाही,' असं वक्तव्य रोहित शर्माने केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Health: दररोज करा हे 2 योगासन, यकृत राहील निरोगी

Liver Health: यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Dharashiv Crime : कळंब शहरात दुकानावर दरोडा; १ लाख रुपये व सोने चांदीच्या दागिन्यांची चोरी

Today's Marathi News Live: दादरमधील रेस्टॉरंट बॉम्बने उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ

Rinku Singh- Yash Dayal: एका ओव्हरमध्ये ५ षटकार मारणाऱ्या रिंकूची यश दयालसाठी खास पोस्ट - Photo

SCROLL FOR NEXT