BCCI Sacks National Selection Committee
BCCI Sacks National Selection Committee Saam TV
क्रीडा | IPL

Cricket News : टी २० वर्ल्डकपमधील पराभवानंतर BCCI ची पहिली मोठी कारवाई; दिग्गजांची केली हकालपट्टी

Satish Daud-Patil

मुंबई : नुकतीच​ ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक (T20 World Cup)  स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या सेमीफायनल सामन्यात टीम इंडियाचा इंग्लंडने दारूण पराभव केला. हा पराभव भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवाचा मुद्दा बीसीसीआयने गांभीर्याने घेतला असून सर्व निवडकर्त्यांची हकालपट्टी केली आहे.  (Sports News)

बीसीसीआयने निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा आणि त्यांच्या संपूर्ण टीमला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. इतकेच नाही तर बीसीसीआयने या रिक्त पदांसाठी नवीन अर्जही मागवले आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २८ नोव्हेंबर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असेल असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे. (Cricket News)

टी२० विश्वचषकासाठी बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा होते. आता निवड समितीमध्ये चेतन शर्मा यांच्याशिवाय आणखी चार सदस्य हरविंदर सिंग (मध्य विभाग), सुनील जोशी (दक्षिण विभाग) आणि देबाशिष मोहंती (पूर्व विभाग) यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनल सामन्यांत इंग्लंडकडून टीम इंडियाचा (Team India)  लाजिरवाणा झाला. या पराभवासह टीम इंडियाचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. टीम इंडियाच्या पराभवानंतर क्रिडाप्रेमींनी बीसीसीआयवर टीकेची झोड उठली. विश्वचषकात फक्त विशिष्ट खेळाडूंना प्राधान्य देण्यात आल्याचा आरोप क्रिडाप्रेमींकडून करण्यात आला.

हीच गोष्ट लक्षात घेता बीसीसीआयने कठोर निर्णय घेत वरिष्ठ निवड समिती बरखास्त केली आहे. तसेच निवड समितीसाठी नवीन अर्ज मागवले आहे. चेतन शर्माच्या कार्यकाळात टीम इंडिया 2021 मध्ये खेळल्या गेलेल्या T20 वर्ल्ड कपच्या बाद फेरीपर्यंत पोहोचू शकली नव्हती. याशिवाय जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही टीम इंडियाचा पराभव झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : कांदिवलीत निवडणूक भरारी पथकाची मोठी कारवाई; कारमधील १२ लाखांची रोकड जप्त

Pet Care in Summer: उन्हाळ्यात तुमच्या पाळीव प्राण्यांना 'या' पद्धतीनं ठेवा हायड्रेटेड

Sanju Samson Statement: इथंच राजस्थान रॉयल्सकडून चूक झाली; संजू सॅमसनने सांगितलं पराभवाचं कारण

कोल्हापूर : गाेव्याला निघालेल्या खासगी बसनं महिलेस चिरडलं, घटनास्थळी उसळली मोठी गर्दी

Vladimir Putin : पुतीन बनले पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष; शपथ घेताच पाश्चिमात्य देश आणि युद्धावर केलं मोठं भाष्य

SCROLL FOR NEXT