Ind Vs Aus google
Sports

IND vs AUS : कुलदीप-हर्षितचा पत्ता कट, ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडूही संघाबाहेर, पाहा प्लेईंग ११

IND vs AUS 3rd T20 today playing 11 updates : तिसऱ्या टी२० सामन्यासाठी टीम इंडियात मोठे बदल. कुलदीप यादव आणि हर्षित राणा यांना बाहेर तर अर्शदीप सिंह, वॉशिंग्टन सुंदर आणि जितेश शर्मा यांना प्लेईंग ११ मध्ये संधी. संपूर्ण तपशील वाचा.

Namdeo Kumbhar

India vs Australia 3rd T20 Playing 11: नवी मुंबईमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये महिला वनडे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. पावसामुळे या सामन्यात व्यत्यय येईल, असा अंदाज वर्तवलाय जातोय. तर दुसरीकडे तिसऱ्या टी२० सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या टी२० सामन्यासाठी भारतीय संघात ३ महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या संघात एक बदल करण्यात आलाय. (Why was Kuldeep Yadav dropped today)

भारताच्या संघात ३ बदल -

दुसऱ्या टी२० सामन्यात दारूण पराभवानंतर टीम इंडियात ३ महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. भारताचा सर्वोत्कृष्ट टी२० गोलंदाज अर्शदीप सिंह याचे संघात आगमन झालेय. हर्षित राणा याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर दुसरीकडे संजू सॅमसन याच्याऐवजी जितेश शर्मा याला प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्यात आले आहे. चायनामन कुलदीप यादव याला तिसऱ्या सामन्यात बेंचवर बसावे लागणार आहे. वॉशिंग्टन सुंदर याला टीम इंडियाकडून संधी देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात एक बदल -

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श याने नाणेफेक गमावली. ऑस्ट्रेलियाचा हुकमी गोलंदाज जोश हेजलवूड याला आराम देण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाकडून सीन एबोट याला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिलेय. ग्लेन मॅक्सवेल याला बेंचवरच बसावे लागणार आहे. आम्ही चांगली फलंदाजी करून धावांचा डोंगर उभारू, असे मार्श याने नाणेफेकीनंतर सांगितले. आम्हालाही प्रथम गोलंदाजीच करायची होती, असेही तो म्हणाला.

ऑस्ट्रेलियाची प्लेईंग ११

मिचेल मार्श (कर्णधार), ट्रेविस हेड, जोश इंग्लीश, टीम डेव्हिड, मिचेल ओवेन, मार्कस स्टॉयनिस, मॅट शॉर्ट, झेवियर बार्टलेट, नॅथन इलिस, सीन एबोट, मॅट कुहनमन

भारताची प्लेईंग ११

शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, अक्षर पटेल, शिवम दुबे, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंह, वरूण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निवडणुकांमुळे नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन १० दिवस पुढे जाण्याची शक्यता

Local Body Election : वारे फिरणार! राज्यात ७२ तासांत आचारसंहिता लागणार? ३ टप्प्यात निवडणुका होणार

Guru Vakri: 120 दिवसांनी देवगुरु चालणार वक्री चाल; धन-संपत्तीमध्ये होणार वाढ, नवी नोकरीचीही संधी

Pune: पुण्यात खाकीवर डाग! २ कोटींची लाच मागितल्याप्रकरणी PSI ताब्यात, गुन्ह्यात मदत करण्यासाठी घेतले पैसे

Women World Cup Final: हातात तिरंगा आणि पाणावलेले डोळे! एकमेकींना मिठी मारल्यानंतर हरमनप्रीत-स्मृतीला अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT