shakib al hasan twitter
Sports

Shakib Al Hasan: निवडणूक जिंकताच पहिल्याच दिवशी शाकिबचा राडा! गर्दीत चाहत्याच्या कानशिलात पेटवली; Video

Shakib Al Hasan Viral Video: निवडणूक जिंकताच त्याने पहिल्याच दिवशी राडा घातला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

Ankush Dhavre

Shakib Al Hasan Slapped Fan:

बांगलादेशचा स्टार क्रिकेटपटू शाकिब अल हसनने राजकारणाच्या खेळपट्टीवर पदार्पण केलंय. त्याने पदार्पणातच शतक झळकावलंय. त्याने बांगलादेशच्या निवडणूकीत विजय मिळवत देशाच्या संसदेत स्थान मिळवलं आहे.दरम्यान निवडणूक जिंकताच त्याने पहिल्याच दिवशी राडा घातला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

शाकिब अल हसन मैदानावर असताना आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीसह आपल्या वादांमुळे देखील चर्चेत राहिला आहे. त्याने अनेकदा अंपायरसोबत वाद घातला आहे. रागात स्टम्पला लाथ मारली आहे. या कारणामुळे त्याच्यावर बंदीही घातली गेली होती. मात्र यावेळी तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की, शाकिबला गर्दीत लोकांनी वेढलं आहे. यादरम्यान तो एका चाहत्याच्या कानाखाली मारताना दिसून येत आहे. मात्र व्हायरल व्हिडिओतील घटना केव्हा आणि कधी घडली हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. सोशल मीडियावर असा दावा केला जातोय की, हा राडा निवडणूक निकाल जाहीर होण्याच्या एक आठवड्याआधी झाला असावा.

असा दावा करण्यात येत आहे की, शाकिब अल हसन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचला त्यावेळी त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. तो पोहोचताच चाहत्यांनी त्याला घेरलं. एका चाहत्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान परिस्थिती नियंत्रणात गेल्यानंतर शाकिबने त्याला कानाखाली मारली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil: कधीच वेगळा गट केला नाही,साहेबांचा निर्णय मान्य केला; राजीनामा देताना जयंत पाटील भावुक

Sanjay Dutt: संजय दत्त लवकरच या ५ चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ

Maharashtra Politics: फडणवीसांच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार; कुणाला डच्चू, कुणाला संधी?VIDEO

Chapati Nachos : चपातीपासून घरीच करा कुरकुरीत नाचोस, नाश्त्यासाठी ५ मिनिटांत बनवा रेसिपी

Maharashtra Tourism: महाराष्ट्रातील स्वित्झर्लंड! शांत वातावरण अन् सुंदर निसर्ग,'या' ठिकाणी एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT