bihar cricket association twitter
क्रीडा

Ranji Trophy: BCCI चा ढिसाळ कारभार! खेळपट्टी सुकवण्यासाठी करावा लागतोय देसी जुगाड - Photo

Moin-ul-Haq Stadium Patna: रणजी ट्रॉफी स्पर्धेतील बिहार विरुद्ध कर्नाटक यांच्यातील सामना सुरु असताना मोईनुल हक स्टेडियमचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

रणजी ट्रॉफी स्पर्धेतील बिहार विरुद्ध कर्नाटक सामना पटनातील मोईनुल हक स्टेडियममध्ये सुरू आहे. हा सामना सुरू असतानाच पावसाने हजेरी लावली. पावसामुळे खेळपट्टी ओली झाली आणि सामना थांबवावा लागला.

पण सुविधांचा अभाव असल्यामुळे खेळपट्टी सुकवायची तरी कशी? असा प्रश्न पडताच ग्राउंड स्टाफच्या कर्मचाऱ्यांनी देसी जुगाड लावून खेळपट्टी सुकवण्याचा प्रयत्न केला. या जुगाडाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे.

बीसीसीआय हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. इतका पैसा इतर कुठल्याही बोर्डकडे नाही, जितका एकट्या बीसीसीआयकडे आहे. मात्र साधी खेळपट्टी सुकवण्याची सुविधा नसल्याने नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा बीसीसीआयला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

व्हायरल होत असलेला फोटो पटनातील मोईनुल हक स्टेडियममधील असल्याचं म्हटलं जातं आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, ग्राउंड स्टाफमधील सदस्य खेळपट्टी सुकवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करत आहेत.

भारतात असे अनेक स्टेडियम आहेत, ज्यांचं ड्रेनेज सिस्टम हे खूप चांगलं आहे. काही दिवसांपूर्वीच बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यातही पाऊस पडला होता. मात्र ड्रेनेज सिस्टम चांगलं असल्याने सामन्याला काही तासात सुरुवात झाली.

व्हायरल होत असलेला फोटो हा २७ ऑक्टोबरचा असल्याचं म्हटलं जात आहे. पावसामुळे लंचपर्यंत सामन्याला सुरुवात होऊ शकली नव्हती. त्यानंतर नाईलाजाने दिवसाचा खेळ रद्द करावा लागला. या स्टेडियमची ही अवस्था पहिल्यांदा झालेली नाही. तर यापूर्वी देखील असं चित्र पाहायला मिळालं आहे. त्यावेळी बिहार क्रिकेट असोसिएशनने स्पष्टीकरण देत म्हटले होते की, यावर काम करण्यात येईल. मात्र अजूनपर्यंत काहीच काम करण्यात आलेलं नाही. त्यामुळे नेमकी चूक कोणाची? बीसीसीआय की बिहार क्रिकेट असोसिएशन हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : कल्याण पूर्वेत महायुतीत बंडखोरी, भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांनी भरला अपक्ष फॉर्म

Mahim Constituency : अमित ठाकरेंना आव्हान कायम; सदा सरवणकरांच्या पुत्राचा लढण्याचा निर्धार, म्हणाले,' छत्रपती लढले अन् जिंकले'

Akshaya Deodhar: अक्षया देवधरची हटके एन्ट्री; या मालिकेत दिसणार

VIDEO : उद्धवसेनेला मोठा धक्का, किशनचंद तनवाणी यांनी घेतली माघार; मोठं कारण आलं समोर

BJP MLA Ticket Cut: भाजपच्या तिसऱ्या यादीत विद्यमान आमदारांना धक्का! कोणाचं कापलं तिकीट? वाचा

SCROLL FOR NEXT