Ishan Kishan T20 World Cup 2026 : विश्वचषकाचा थरार शिगेला पोहोचलेला होता. भारतीय संघ अहमदाबादमध्ये फायनल खेळण्यासाठी पोहचला होता. पण त्याचवेळी इशान किशन याच्यावर दुखाचा डोंगर कोसळला. चुलत बहिणीच्या अपघाती (Ishan Kishan cousin dies before T20 World Cup final ) निधनाची बातमी येऊन धडकली. काही तासांवर विश्वचषकाची फायनल होती, त्याचवेळी इशान किशन याच्यावर वैयक्तिक आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला. बहिणीच्या निधनाच्या वेदनादायी बातमीने इशान पूर्णपणे खचून गेला होता, मात्र अशाही परिस्थितीत त्याने कमालीचा संयम आणि जिद्द दाखवत देशासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.
इशान किशन याचे वडील प्रणव पांडे लेकाचा सामना पाहण्यासाठी शुक्रवारी पाटनाहून अहमदाबादकडे निघाले होते. विमानातळावर जात असताना नातेवाईकाच्या निधनाची बातमी धडकली. कुटुंबातील २ जणांचा मृत्यू झाला. लग्नाला निघालेल्या कुटुंबावर काळा घाला घातला अन् २ जणांचा मृत्यू झाला. मृत दोन्ही नातेवाईक इशान किशनचे होते. सामन्याच्या आदल्या दिवशी ही दुखद बातमी इशानपर्यंत येऊन पोहचली.
कुटुंबातील चुलत बहीण आणि अन्य एका व्यक्तीच्या मृत्यूची बातम समजताच इशान किशन पुरता हादरला. इशान किशन याला कुटुंबायाला भेटयाला जायचे होते. पण अंतिम सामन्यात भारतासाठी मैदानात उतरण्याचा त्याने निर्णय घेतला. इशान किशन याने फोनवरच कुटुंबियांसोबत संवाद साधला. त्यानंतर फायनलसाठी तयार झाला. इशान किशन याने दुख बाजूला ठेवत फायनलमध्ये २५ चेंडूत ५४ धावांची झंझावाती खेळी केली.
अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या इशान किशनने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी हा विजय त्याच्या चुलत बहिणीला समर्पित केला. तो म्हणाला की, 'मी माझ्या जवळचा मित्रांना आणि हार्दिक पांड्याला माझ्या मनातील वेदना, दुख सांगितले. त्यावेळी मला त्यांनी टी२० विश्वचषकावर फोकस करण्यास सांगितले. कुटुंबापेक्षा देशाला पुढे ठेवण्याचा सल्ला त्यांनी मला दिला. त्यामुळेच मी फायनलमध्ये चांगली कामगिरी करू शकलो.'
फायनलमध्ये इशान किशन याने २५ चेंडूत ५४ धावांचा पाऊस पाडला. यामध्ये ४ षटकार आणि चार चौकारांचा समावेश आहे. इशानने संजूसोबत ४८ चेंडूत १०५ धावांची शानदार भागिदारी केली. इशान याने फक्त फलंदाजीतच नाही तर फिल्डिंगमध्येही आपला करिश्मा दाखवला. इशान याने ३ महत्त्वाचे झेल घेतले. रचिन रवींद्र, टिम सेफर्ट आणि डॅरिल मिशेल यांचे झेल घेत भारताच्या विजयाचा मार्ग सूकर केला. दरम्यान, इशान किशन याने टी२० विश्वचषकात खोऱ्याने धावा काढल्या. इशान किशन याने ३ अर्धशतकाच्या मदतीने ३१७ धावा केल्या. संजू सॅमसननंतर सर्वाधिक धावा काढणारा तो फलंदाज ठरलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.