क्रिडा विश्वातून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अंडर-19 देशांतर्गत स्पर्धेच्या कूचबिहार ट्रॉफीच्या अंतिम फेरीच्या सामन्यात कर्नाटकच्या फलंदाजाने सर्वात मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
कर्नाटकचा फलंदाज प्रखर चतुर्वेदीने तडाखेबंद फलंदाजी करताना तब्बल नाबाद ४०० धावा कुटल्यात. या फलंदाजाच्या जबरदस्त कामगिरीची अवघ्या क्रिडा विश्वात चर्चा होत आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कोणत्याही भारतीयाने केलेली ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अंडर-19 देशांतर्गत कूचबिहार ट्रॉफी स्पर्धा सध्या सुरू आहे. या स्पर्धेदरम्यान कर्नाटकविरुद्ध मुंबई (Karnataka Vs Mumbai) असा अंतिम सामना झाला. या सामन्यात कर्नाटकच्या फलंदाजाने तब्बल नाबाद ४०० धावा कुटण्याचा पराक्रम केला आहे.
प्रखर चतुर्वेदी (Prakhar Chaturvedi) हा या संघाचा सलामीवीर आहे. त्याने 638 चेंडूत 46 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 404 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर कर्नाटकने 8 गडी गमावत 890 धावा केल्या आणि डाव घोषित केला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तत्पुर्वी या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात 380 धावा केल्या होत्या. प्रखर चतुर्वेदीच्या या दमदार खेळीमुळे कर्नाटककडे 510 धावांची आघाडी आहे. या विक्रमी खेळीसोबतच प्रखर चतुर्वेदी कूचबिहार ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही ठरला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कोणत्याही भारतीयाने केलेली ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे भारतीय!
भाऊसाहेब बाबासाहेब निंबाळकर- 443 नाबाद, विरुद्ध काठियावाड, पुणे 1948 (रणजी)
प्रखर चतुर्वेदी- ४०४ नाबाद, विरुद्ध मुंबई, २०२३-२४ (कूचबिहार ट्रॉफी)
पृथ्वी शॉ- 379, विरुद्ध आसाम, 2022-23 (रणजी करंडक)
संजय मांजरेकर- 377, विरुद्ध हैदराबाद, 1991 (रणजी करंडक)
मातुरी वेंकट श्रीधर- 366, विरुद्ध आंध्र, 1994 (रणजी करंडक)(Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.